आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲनालिसिस:युरोपात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; आशियात उतरणीला, थंडीमुळे संसर्गवाढीची तज्ज्ञांकडून शक्यता

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना महामारीचा आलेख युराेप व आशियात वेगवेगळ्या पद्धतीने दिसू लागला आहे. युराेपात काेराेना संसर्ग सातत्याने वाढू लागला आहे. आशियात मात्र संसर्ग उतरणीला लागल्याचे चित्र आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे युराेपातील संसर्ग वाढल्याचे सांगितले जाते. युराेपात अजूनही परीक्षणाचे काम केले जात आहे. त्यामुळेच काेराेनाचे रुग्ण जास्त संख्येने समाेर येत आहेत. युराेपात ब्रिटन, रशिया, जर्मनी व इटलीत काेराेनाचे रुग्ण अजूनही वाढत आहेत. ब्रिटनमध्ये बाधितांचे प्रमाण १४ टक्के आहे. रशियात १५ टक्के एवढ्या वेगाने त्यात भर पडल्याचा दावा जागतिक आराेग्य संघटनेने केला आहे. आशियात भारत व चीनमध्ये रुग्णसंख्येत घट हाेत आहे.

जर्मनी : सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याने चिंता
जर्मनीत काेराेनाच्या रुग्णसंख्येत मे महिन्यानंतर सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जर्मनीत शनिवारी प्रति लाखांमागे १०० लाेकांना बाधा झाली. मेमध्ये प्रति एक लाख लाेकांमध्ये संसर्गाचा दर ९५.१ टक्के हाेता.

आॅस्ट्रिया : विना डाेस घराबाहेर पडण्यास मनाई
युराेपीय देश आॅस्ट्रियामध्ये गेल्या आठवड्यादरम्यान प्रति एक लाख लाेकांमागे २२८ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी हे प्रमाण एक लाखामागे १५२ एवढे हाेते. लस न घेता घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारचा तसा इशारा आहे.

ब्रिटन : थंडीसाठी कठाेर पावले उचलण्याची तयारी
काेराेनाचे वाढते रुग्ण पाहता बाेरिस जाॅन्सन सरकारने थंडीसाठी कठाेर पावले उचलण्याची तयारी केली आहे. सध्या तरी सरकारने त्यास प्लॅन बी असे नाव दिले आहे. त्यानुसार व्हॅक्सिन पासपाेर्ट लागू करण्याचाही विचार आहे.

रशिया : राष्ट्रव्यापी निर्बंध लागू करण्याची तयारी
रशियात शनिवारी काेराेनामुळे १०७५ जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशात लसीकरण कमी झाले. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगितले जाते. रशियात काेराेनामुळे आॅगस्टपासून आतापर्यंत चार लाख लाेकांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...