आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार:ऑनलाइन जुगारात वाढ, 55 हजार कोटींचा सट्टा; ब्रिटनची डोकेदुखी नवे सव्वा कोटी सट्टेबाज

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेटिंगच्या फर्म मालामाल, नफ्यात ७५ टक्क्यांनी वाढ

कोरोना महामारीमुळे लाेकांवर घरात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्मार्टफोनसह इतर गॅझेटला दिला जाणारा वेळ वाढला आहे. यातून ब्रिटनमध्ये ऑनलाइन बेटिंगचे व्यसन बळावू लागले आहे. ब्रिटिश नियामकाच्या म्हणण्यानुसार महामारी आल्यानंतर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले. कोरोनापूर्वी १.०८ कोटी लोक ऑनलाइन सट्टेबाजी करत होते. कोरोनानंतर ही संख्या १३ लाखाने वाढून १.२१ कोटीवर गेली आहे.ऑनलाइन खेळणाऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. ऑनलाइन बेटिंग खेळ घेणारे ऑपरेटर्स मालामाल झाले आहेत. त्यांच्या नफ्यात ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सट्टेबाजीचे व्यसन लागण्यामागे ऑकडाऊननंतर स्मार्टफोन हे मोठे कारण ठरते. त्यामुळे जुगार सोपा झाला आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन गॅम्बलर्सपैकी ५० टक्क्यांनी जुगार खेळण्यासाठी स्मार्टफोनची मदत घेतली. ही संख्या २०१६ च्या तुलनेत २९ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून बेटिंगमध्ये घट झाली आहे. ऑनलाइन बेटिंग वाढत चालली आहे. २०१८-१९ च्या तुलनेत बेटिंगचा बाजार ८.१ टक्क्यांनी वाढून ५५ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. फेब्रुवारीत आयाेगाने आॅनलाइन बेटिंगला सुरक्षित करण्यासाठी परिवर्तनाची घोषणा केली होती. त्यात जय-पराजयाची सीमा निश्चित करण्यात आली हाेती. यूजर्सच्या हितांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना ऑपरेटर्सना देण्यात आली होती.

ऑनलाइन सट्टेबाजी रोखण्याची मागणी : ऑनलाइन सट्टेबाजीच्या विरोधात मोहीम चालवणारे क्लीन अप गॅम्ब्लिंगचे संचालक मॅट जर्ब-कुसिनने ऑनलाइन बेटिंगवर बंदीची मागणी केली. ते म्हणाले, ऑकडाऊनमध्ये गॅम्बलिंगचा पूर आला आहे. जुगार खेळणाऱ्यांपैकी ६० टक्के जणांना हे व्यसनच लागले आहे. सरकारने ऑनलाइनच्या बेटिंगचा विचार केला पाहिजे. गॅम्बलिंग आयोगाने देशात बेटिंग उद्याेगावर निर्बंध घालावेत. परवाने असलेल्या ऑपरेटर्सला त्याची परवानगी असावी.

बातम्या आणखी आहेत...