आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:ड्रम वादनात शारीरिक-मानसिक रूपाने सक्रिय व्हावे लागल्याने मुलांची संवाद क्षमतेत वाढ

लंडन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत आराेग्यासाठी चांगले असते. त्यातही ड्रम वादन हे उत्कृष्ट ठरू शकते. या वाद्याचे वादन करताना शारीरिक तसेच मानसिक रूपाने सक्रिय व्हावे लागते. हातापायांचा ताळमेळही ठेवावा लागताे. त्याचबराेबर वाद्यवृंदातील इतर साथीदार काय करत आहेत, याकडेही लक्ष ठेवावे लागते. म्हणजे मेंदूही तितकाच सक्रिय ठेवावा लागताे. किंबहुना या सर्व गाेष्टी ड्रम वादनातील महत्त्वाच्या गाेष्टी ठरतात. ड्रम वादन केल्यास भावनिक तसेच वर्तनविषयक अडचणींना ताेंड देणाऱ्या मुलांसाठी अत्यंत मदत करणारे ठरू शकते, असा दावा किंग्ज काॅलेजच्या ताज्या संशाेधनातून करण्यात आला आहे. आॅटिझम पीडित मुलांना त्याचा लाभ होऊ शकताे. क्लेम वर्क क्लेमिंग प्राेजेक्टनुसार अशा मुलांना ड्रमिंग शिकवल्यास ते सामान्यपणे प्रतिक्रियांना नियंत्रित करू लागतात. त्यांना दिलेले काम ते अतिशय प्रभावीपणे लक्षपूर्वक करतात. त्याव्यतिरिक्त इतर लाेकांच्या तुलनेत जास्त चांगल्या प्रकारे संवादही साधू शकतात. प्राेसिडिंग्ज् आॅफ द नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसमध्ये प्रकाशित या संशाेधनात ड्रम वाजवताना होणाऱ्या न्यूराॅलाॅजिकल परिवर्तनाचाही उल्लेख करण्यात आला आहे. संशाेधन प्रकल्पाच्या प्रमुख मॅरी कहार्ट यांच्या म्हणण्यानुसार ३६ आॅटिस्टिक किशाेरवयींनांना दाेन गटांत विभागण्यात आले. एका गटाला आठवड्यातून दाेनवेळा ड्रम वादन शिकवण्यात आले. असे आठ आठवडे करण्यात आले. दुसऱ्या गटाला ड्रम वादन शिकवले नव्हते.

विविध क्रियांमध्ये समन्वय घडून येताे
ड्रम वादनात सुधारणा घडवून आॅटिस्टिक किशाेरवयींनामध्ये सक्रियता वाढीस लागते. त्यांच्यातील अनावधान कमी होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या मेंदूतील संपर्क यंत्रणा अधिक बळकट होऊ लागते. विविध क्रियाविषयक संपर्कात एकप्रकारचा समन्वय पाहायला मिळताे, असे मेंदूच्या एमआरआयमधून दिसून आले.

ड्रम वादनात सुधारणा घडवून आॅटिस्टिक किशाेरवयींनामध्ये सक्रियता वाढीस लागते. त्यांच्यातील अनावधान कमी होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या मेंदूतील संपर्क यंत्रणा अधिक बळकट होऊ लागते. विविध क्रियाविषयक संपर्कात एकप्रकारचा समन्वय पाहायला मिळताे, असे मेंदूच्या एमआरआयमधून दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...