आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत होऊ शकतात. अमेरिकन संसदेच्या सिनेटच्या (वरच्या सभागृह) परराष्ट्र संबंध समितीने भारतातील राजदूत पदासाठी गार्सेटी यांच्या बाजूने मतदान केले. आता सिनेटमध्ये मतदान होणार असून त्यानंतर एरिक भारतातील अमेरिकेचे राजदूत बनतील.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गार्सेटी यांना उमेदवारी दिली. परराष्ट्र संबंध समितीच्या 13 सदस्यांनी गार्सेटी यांच्या बाजूने मतदान केले. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन खासदार - टॉड यंग आणि बिल हॅगर्टी यांचा समावेश होता. यादरम्यान समितीने म्हटले की, भारतात कायमस्वरूपी राजदूत ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.
सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने एकमताने गार्सेटींची निवड केली. लवकरच नियुक्तीला मंजुरी मिळू शकते. राजदूतांना सिनेटची मान्यता न मिळण्यामागे अनेक तज्ज्ञांनी राजकीय हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे.
यापूर्वीही नॉमिनेशन झाले, परंतु नियुक्ती झाली नाही
समितीच्या 8 सदस्यांनी गार्सेटींच्या विरोधात मतदान केले. गार्सेटी यांना गेल्या वर्षीही नामनिर्देशित करण्यात आले होते, परंतु लॉस एंजेलिसचे महापौर असताना लैंगिक अत्याचार करणाऱ्या त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांवर कारवाई केली नाही म्हणून त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती झाली नव्हती.
मे 2022 मध्ये सिनेटमध्ये सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे - गार्सेटी यांना माहिती होते की त्यांचे चीफ ऑफ स्टाफ रिक जेकब्स यांनी लॉस एंजेलिस पोलिस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केला होता. असे असूनही गार्सेटी यांनी जेकब्सवर कारवाई केली नाही.
अमेरिकेचे राजदूत 2 वर्षांपासून भारतात नाहीत, संबंध बिघडू शकतात
अमेरिकेचा भारतात 2 वर्षांपासून कायमस्वरूपी राजदूत नाही. भारतासारख्या महत्त्वाच्या देशात कायमस्वरूपी राजदूत नसल्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. राजदूताला महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्थानिक दृष्टिकोनाची समज असते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील विवादांवर तोडगा काढण्यात मदत होते.
ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये राजदूत नसल्यामुळे व्यवसायात अडचणी येत आहेत. त्यामुळेच धोरणाच्या प्रगतीत अडथळे येत आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये, अमेरिकेने ए. एलिझाबेथ जोन्स यांची भारतीय दूतावासाच्या तात्पुरत्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. कायमस्वरूपी राजदूत नसताना हा काळ भारत-अमेरिका संबंधांमध्ये सर्वाधिक गोंधळाचा ठरला आहे.
भारतातील अमेरिकेच्या राजदूताची अनुपस्थिती ही मोठी चूक : तज्ज्ञ
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील सिगुर सेंटर फॉर एशियन स्टडीजच्या प्राध्यापिका दीपा ओलापल्ली म्हणतात की, अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. एकीकडे जपान, ऑस्ट्रेलिया, द. कोरिया, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये अमेरिकेचे राजदूत उपस्थित आहेत, पण त्याच वेळी भारतात अमेरिकन राजदूत नसणे ही मोठी चूक आहे.
अमेरिकेचे 50 देशांमध्ये कायमस्वरूपी राजदूत नाहीत
सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि यूएईसह 50 देशांमध्ये अमेरिकेचे कायमस्वरूपी राजदूत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.