आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन तणाव:भारत, आशियाई देशांना चीनकडून धोका; लष्कर पाठवू : अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या या कारवाया भारतासह आशियास धोकादायक

भारत-चीन तणावादरम्यान अमेरिकेने युरोपातील आपले लष्कर कमी करून आशियात पाठवणे सुरू केले आहे. अमेरिकी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनच्या या कारवाया भारतासह आशियास धोकादायक असल्याचे नमूद करून अमेरिका या भागात लष्कर पाठवेल, असा दावा केला.

जर्मनीत अमेरिकी सैन्य का कमी केले, असा प्रश्न ब्रुसेल्स फोरमच्या आभासी परिषदेत पॉम्पिओ यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. विशेष म्हणजे, भारत-चीन तणाव सुरू झाल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमान तीन वेळा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, हा प्रस्ताव भारताने धुडकावला आहे. दरम्यान, चीनने गलवान खोरे, हॉट स्प्रिंग्ज, देपसांग आणि पेगाँगमध्ये सैन्य वाढवले असून या भागात १२० लष्करी वाहनेही दाखल झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...