आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा9 डिसेंबरला अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा जागतिक मीडियामध्येही उल्लेख केला जात आहे. हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटले आहे की, चकमक झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. बीबीसीने लिहिले - चकमकीत भारतापेक्षा चिनी सैनिकांचे जास्त नुकसान झाल्याची बातमी आहे.
सोशल मीडियावर काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत. हे तवांग चकमकीचे व्हिडिओ असल्याचे युजर्स सांगत आहेत. 'दिव्य मराठी' या व्हिडिओंना दुजोरा देत नाही. बहुतेक युजर्स अभिनेत्री रिचा चढ्ढाला ट्रोल करत आहेत. ते लिहित आहेत- Tawang Says Hi... वास्तविक, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते की, जर सरकारने आदेश दिला तर आम्ही पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेण्यास तयार आहोत. यावर रिचाने ट्विट केले होते- Galwan Says Hi... नंतर ऋचाने तिच्या ट्विटबद्दल माफीही मागितली होती.
तवांग संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज म्हणजेच मंगळवारी संसदेत उत्तर देणार आहेत. त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांचीही बैठक घेतली. अरुणाचल ईस्टचे भाजप खासदार तापीर गाओ म्हणाले - जर चिनी सैनिकांनी सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना धडा शिकवू.
9 डिसेंबरची चकमक, लष्कराने 600 चिनी लोकांचा पाठलाग केला 9 डिसेंबरला तवांगमधील यंगस्टे येथे 17 हजार फूट उंचीवर असलेली भारतीय चौकी हटवण्यासाठी 600 चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ते काटेरी काठ्या आणि इलेक्ट्रिक बॅटनने सज्ज होते. भारतीय लष्करही यावेळी पूर्णपणे सज्ज होते. आमच्या सैन्यानेही त्यांना काटेरी लाठ्या आणि रॉडने प्रत्युत्तर दिले. यामध्ये डझनभर चिनी सैनिकांची हाडे मोडली आहेत. 9 डिसेंबरची संपूर्ण घटना आणि सीमावादाचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा...
आता बघा सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ...
तवांग संघर्षावर जागतिक माध्यमांनी काय म्हटले?
हाँगकाँगचे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टः हाँगकाँगची वेबसाइट द साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने भारतीय लष्कर आणि मीडियाचा हवाला देत चकमकीत 20 भारतीय सैनिक जखमी झाल्याचे लिहिले आहे. बातमीत भारतापेक्षा चीनचे जास्त सैनिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारत आणि अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने या चकमकीबाबत मौन बाळगल्याचे लिहिले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर अद्याप काहीही सांगितलेले नाही.
ब्रिटनचे बीबीसी : वृत्तसंस्था रॉयटर्सचा हवाला देत त्यांनी बातमी दिली आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दोन्ही देशांमध्ये चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. बीबीसीने भारताकडून जखमी झालेल्या सैनिकांची संख्या 6 दिली आहे. चिनी बाजूने या चकमकीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
जर्मनीचे DW : एजन्सी आणि भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत वृत्त दिले आहे. 9 डिसेंबर रोजी विवादित सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांशी भिडले. एएफपीच्या हवाल्याने लिहिले की, चिनी सैनिक सीमेच्या अगदी जवळ आले होते. यानंतर भारतीय जवानांनी यावर प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानचे डॉन : औली येथे अमेरिकेसोबत झालेल्या लष्करी सरावाला चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचे कारण सांगण्यात आले आहे. पाकिस्तानच्या मीडिया वेबसाइट डॉनने लिहिले आहे की, भारत-अमेरिका लष्करी सरावानंतर काही दिवसांनी ही चकमक झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे काही सैनिक जखमी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.