आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गलवान चकमकीनंतर 21 दिवसांनी चीन एलएसीवर 2 किलोमीटर मागे सरकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार 30 जून रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सैन्य मागे घेण्यास सहमती झाली होती. रविवारी जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा समजले की, चीन माघार घेतली आहे.
15 जून रोजी गालवानमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले. 40 चिनी सैनिकही मारले गेले पण चीनने हे स्वीकारले नाही. या चकमकीनंतर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये डिप्लोमॅटिक आणि सैन्य पातळीवरील बैठका सुरू होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक शुक्रवारी लडाखमध्ये फॉरवर्ड लोकेशनवर पोहोचून सैनिकांची भेट घेतली होती. मोदी जवानांना म्हणाले की, तुम्ही जे शौर्य दाखवले त्यामुळे जगाने भारताची ताकद पाहिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.