आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • International
 • India China Border NewsUpdate : India China Ladakh Galwan Valley Dispute, Disengagement Between Army Of India And China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलवान खोऱ्यात सुधारतेय परिस्थिती:चकमक झालेल्या पॉइंट-15 येथून भारत आणि चीनच्या सैन्याने घेतली माघार, गोगरा आणि हॉट स्प्रिंगमध्ये प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यातील पेट्रोल पॉईंट 15 येथे भारत आणि चीनमधील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता
 • चर्चेनंतर दोन्ही सैन्याने मंगळवारपासून गलवान, हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातून माघार घेतली

गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या 23 दिवसांनंतर येथे परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर वर आली आहे. बुधवारी सैन्याने सांगितले की, 'दोन्ही देशांच्या सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट- 15 व्या स्थानावरुन माघार घेतली आहे. चीनची सेना सुमारे दोन किमी मागे गेली आहे. दुसरीकडे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागात सैन्याने माघार घेतली असून ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल.

रविवारीपासून चीनने या ठिकाणी आपली संरचना पाडून टाकण्यास सुरूवात केल्याचे वृत्त आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या कराराच्या अनुषंगाने दोन्ही सैन्य चकमक झालेल्या ठिकाणापासून दीड ते दोन किलोमीटर मागे हटतील.

गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील सैन्य अधिकार्‍यांमधील अनेक पातळींवरील चर्चा झाल्या. मात्र एकमत झाले नाही. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्याशी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी याची व्हिडिओ कॉलवर दोन तास चर्चा झाली. चर्चेनंतर काही तासांनंतर चीनने सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतला.

या 5 मुद्यांवर सहमती

 • पॉईंट पीपी -14, पीपी -15, हॉट स्प्रिंग्ज आणि फिंगर एरियामध्येही भारत आणि चीनमध्ये वाद आहे. सैनिक या भागातूनही माघार घेतील.
 • सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि संबंध वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी ताळमेळ ठेवायला हवा. जर विचार जुळले नाही तर वाद उपस्थिती करु नये. 
 • एलएसीवरील सेना हटवण्याची आणि डी-एस्केलेशनची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. हे काम फेज वाइज करण्यात यावे.
 • दोन्ही देशांनी एलएसीचा आदर करावा आणि एकतर्फी पाऊले उचलू नयेत. भविष्यातील सीमा घटना टाळण्यासाठी एकत्र मिळून काम करावे. 
 • एनएसए डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील चर्चा सुरू ठेवतील जेणेकरुन दोन्ही देशांच्या करारांनुसार सीमेवर शांतता व प्रोटोकॉल टिकून राहावा. 

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक ठार झाले. 40 चिनी सैनिकही मारले गेले पण त्यांनी ते स्वीकार केले नाही.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser