आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत-चीन यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी आज दोन्ही देशांमध्ये जॉइंट सेक्रेटरी लेव्हलची बैठक होऊ शकते. मीटिंग झाली तर ती गलवान चकमकीनंतर पहिली डिप्लेमेटिक चर्चा असेल. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये आर्मी अधिकाऱ्यांमध्येच चर्चा होत होती.
यापूर्वी सोमवारी चीन सीमेवर मॉल्डो येथे लेफ्टनंट जनरल लेव्हलची बैठक झाली. यानंतर, मंगळवारी भारतीय सैन्याने सांगितले की, दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यावर सहमती झाली आहे. पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणावरुन दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले होते.
सैन्यप्रमुख लडाख दौऱ्यावर, जखमी सैनिकांची घेतली भेट
लष्कर प्रमुख जनरल एमएम जनरल नरवणे मंगळवारी लडाख येथे दाखल झाले. चीनशी झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. ते आजही लडाखमध्ये राहतील.
परराष्ट्रमंत्री म्हणाले- आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आवश्यक आहे
विदेशमंत्री एस जयशंकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंगळवारी आरआयसी (रशिया-भारत-चीन) परिषदेत सामील झाले. चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत ते म्हणाले - 'ही बैठक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांवरील आमच्या विश्वासाची पुनरावृत्ती करते." आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आणि सर्वांच्या हिताला चालना देणे हाच स्थिर व्यवस्था निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे. '
चीन म्हणाले - आमचे 40 सैनिक मारले गेल्याचे वृत्त चुकीचे
15 जून रोजी लडाखच्या गालवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात चकमक झाली. यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले. 40 चिनी सैनिकही मारले गेले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. चीनने मंगळवारी सांगितले की, आमचे 40 सैनिक मारले गेले हे वृत्त चुकीचे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.