आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • India China Ladakh Border News Update | India China Border Standoff Ladakh Galwan Valley Violence 18 Junr Latest News Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनची धमकी:सरकारी वृत्तपत्राने म्हटले - सीमेवर तणाव वाढल्यास भारताला चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळच्या सैन्यदलांचा दबाव सहन करावा लागेल

बीजिंग10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी श्रीनगरजवळील बालटालमध्ये चर्चा करीत असलेले भारतीय सैनिक. - Divya Marathi
बुधवारी श्रीनगरजवळील बालटालमध्ये चर्चा करीत असलेले भारतीय सैनिक.
  • चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पाकिस्तान आणि नेपाळ चीनसोबत असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला
  • सोमवारी भारत-चीन सैनिकांमध्ये झडप झाली होती, यात भारताचे 20 जवान शहीद झाले

गलवान खोऱ्यात लष्करांच्या चकमकीनंतर चीनने पुन्हा एकदा एका सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चिनी सरकारचे मुखपत्र माउथपीस ग्लोबल टाइम्सनुसार, एलएसीवर तनाव वाढला तर भारताला चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळ सेनेचा दबाव सहन करावा लागेल. याचा अर्थ भारत-चीन सीमेवर बिघडलेल्या परिस्थितीत पाकिस्तान आणि नेपाळ चीनला पाठिंबा देऊ शकतात.

सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांत झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. दरम्यान चीनचे 43 सैनिक मारले गेले किंवा जखमी झाल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 

मानसिक दबाव निर्माण करण्याचे षड्यंत्र

ग्लोबल टाईम्स हे चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. त्यातील लेख चीन सरकारच्या मतानुसार असतात. हे वृत्तपत्र अनेक दिवसांपासून भारताला धमकावणारे लेख प्रकाशित करत आहे. वृत्तपत्राने शांघाय अकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या संशोधक फेल हू झियोंग यांचा एक लेख प्रसिद्ध केला आहे. यामध्ये झियोंगने म्हटले की, "सध्या भारताचा चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळसोबत सीमा वाद सुरू आहे. पाकिस्तान आणि चीनचे जवळचे संबंध आहेत. नेपाळही आमची सहयोगी आहे. दोन्ही देश चीनच्या वन बेल्ट रोड प्रकल्पाचा भाग आहेत."

भारताकडे इतकी सैन्य ताकद नाही

झियोंग पुढे म्हणतात, " भारताने सीमेवर तणाव वाढवल्यास तीन मोर्चांवर लष्करी दबावाचा सामना करावा लागेल. या दबावाला सामोरे जाण्याची ताकद भारताच्या सैन्याकडे नाही. भारताचा दारुण पराभव होऊ शकतो." झियोंगनुसार, चीन एलएसी बदलू इच्छित नाही. गलवान खोऱ्यात जे काही घडले त्याला भारतीय सैन्यच जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला. कारण, भारतीय सैन्यानेच चिनी सैनिकांना चिथावले होते. 

भारताने चौकशी करावी 

लेखात पुढे म्हटले की, "गलवान खोऱ्यासारख्या घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत हे भारताने ठरवायला हवे. भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. जबाबदार लोकांना कठोर शिक्षा द्यावी." या वृत्तपत्राने चीनमधील लष्करी तज्ञाचे एक विधानही प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यांचे नाव सांगितले नाही. या विधानानुसार, चीनने आपल्या मृत किंवा जखमी झालेल्या सैनिकांची संख्या किंवा नाव यासाठी प्रसिद्ध केले नाही कारण यामुळे तणाव आणखी वाढू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...