आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात कोरोना व्हायरसचे 1 लाख 32 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. जगभरात भारताचा 11वा नंबर लागतो. तर, संक्रमणाच्या बाबतीत आशियात तिस-या नंबरवर आहे. 10 वा सर्वात संक्रमित देश इराणमध्ये आता 1 लाख 33 हजार 521 रुग्ण आहेत. रविवारची अकडेवारी जाहीर झाल्यावर भारत इराणला मागे टाकत आशियातील दुसरा संक्रमित देश बनण्याची शक्यता आहे.
आशियात तिसऱ्या नंबरवर भारत
जगातील सर्वात प्रभावित खंडामध्ये युरोप पहिल्या, उत्तर अमेरिका दुसऱ्या आणि आशिया तिसऱ्या नंबरवर आहे. आशियाात तुर्कीमध्ये सर्वात जास्त 1 लाख 55 हजार 686 कोरोना संक्रमित आहेत. यापैकी अंदाजे 4308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, भारत तिसऱ्या नंबरवर आहे. येथे आतापर्यंत 3868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आशियातील 10 सर्वात प्रभावित देश
देश / संक्रमण / मृत्यू
तुर्की - 1,55,686 / 4,308
इराण - 1,33,521 / 7,359
भारत - 1,31,868 / 3,868
चीन - 82,974 / 4,634
सऊदी अरब - 70,161 / 379
पाकिस्तान - 52,437 / 1,101
कतर - 42,213 / 21
बांग्लादेश - 32,078 / 452
सिंगापुर - 31,068 / 23
यूएई - 28,704 / 244
इराणमध्ये भारतापेक्षा 1500 हजार रुग्ण जास्त
इराणमध्ये भारतापेक्षा 1515 रुग्ण जास्त आहेत. इराणमध्ये 96 दिवसात 1 लाख 33 हजार 521 रुग्ण सापडले. तर, भारतात 116 दिवसात 1 लाख 32 हजार 671 रुग्ण सापडले. भारतात मे महिन्यात सर्वात जास्त 94 हजार 749 रुग्ण समोर आले आहेत. तर, इराणमध्ये एप्रिलमध्ये सर्वात जास्त 49 हजार 47 रुग्ण आढळले.
आशियात 9.37 लाख संक्रमित
आशियात सध्या 9 लाख 37 हजार 210 संक्रमित आहेत, तर 27 हजार 68 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त 7,359 मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. आशिया खंडात भारतात सर्वात वेगाने रुग्ण वाढले. 19 मे पासून दररोज भारतात 5 हजारांच्या वर रुग्ण सापडत आहेत. शनिवारी देशात 6661 रुग्ण आढळले. हाच वेग राहिल्यास चार दिवसात भारत तुर्कीला मागे टाकेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.