आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNSC मध्ये भारताचे खडे बोल:लोकशाहीबद्दल इतरांकडून भारताला शिकण्याची गरज नाही,भारतीय राजदूत रुचिरा कंबोज यांनी सुनावलं

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने लोकशाहीवर काय करावे हे कोणीही सांगण्याची गरज नाही, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये म्हणजेच UNSC मध्ये माध्यमे आणि लोकशाहीच्या स्वातंत्र्याशी संबंधित प्रश्नावर त्या बोलत होत्या.

भारत हा नेहमीच लोकशाही देश राहिला आहे. भारताची मुळे 2500 वर्षे जुनी आहेत. आपल्याकडे लोकशाहीचे चारही स्तंभ आहेत. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यमे. म्हणूनच आजही भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, असे रुचिरा कंबोज म्हणाल्या

देश बदलतोय - रुचिरा कंबोज
15 सदस्यीय UNSC मध्ये रुचिरा कंबोज म्हणाल्या की, भारतात दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. इथे प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण आपले विचार मांडू शकतो. देशात वेगाने सुधारणा आणि बदल होत आहेत. याचे परिणाम खूपच प्रभावी ठरले आहेत. देशात होत असलेले सकारात्मक बदल संपूर्ण जगाला दिसत आहेत. त्यांचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही.

भारताकडे UNSC चे अध्यक्षपद
भारत हा डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले आहे. म्हणजेच या संपूर्ण महिन्यात रुचिरा या UNSC च्या अध्यक्ष असतील. भारताचा दोन वर्षांचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यकाळ महिन्याच्या अखेरीस संपेल. यादरम्यान दहशतवाद आणि इतर जागतिक आव्हानांवर चर्चा होणार आहे.

भारत UNSC चा स्थायी सदस्य नाही
सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. मात्र, भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा चीन आहे. फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनने भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनविण्यास सहमती दर्शवली असली तरी चीन वेगवेगळ्या बहाण्याने भारताच्या स्थायी सदस्यत्वाला विरोध करत आहे.

याशिवाय UNSC च्या रचनेत बदल करण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. यूएनएससीमध्ये विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व कमी आहे. परंतु स्थायी सदस्यांना यामध्ये कोणताही बदल नको आहे आणि व्हेटो पॉवर अन्य कोणत्याही देशाला मिळावे, अशी त्यांची इच्छा नाही. भारताशिवाय जपान, जर्मनी आणि ब्राझील हे देशही सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...