आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण जगातील राजकारण दिल्लीत ५ किमीच्या कक्षेत सामावले आहे. येथे जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचा मेळा भरला आहे. बैठकीत युक्रेन युद्धामुळे रशियाविरुद्ध पाश्चिमात्य देशांचा लढा वरचढ ठरला. जी-२० चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या भारतासमोर पाश्चिमात्य आणि रशियातील सहमती बनवण्याची जबाबदारी आहे. हवामान बदल, ऊर्जा संकटासारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होऊ नये हे पाहिले जाईल. भारत प्रतिष्ठेमुळे जगातील विविध ध्रुवांत सेतू ठरला आहे. रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पाश्चिमात्य देशांवर मॉस्कोच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करण्यासाठी तटस्थ देशांवर दबाव टाकल्याचा आरोप केला.
प्रत्येक स्थितीत युक्रेनला पाठिंबा राहील : डच विदेश मंत्री नेदरलँडच्या विदेशमंत्री वापके होकेस्ट्रा म्हणाल्या, युक्रेनला पाठिंबा सुरू राहील. यात युक्रेनच्या सार्वभौमत्वाशिवाय खूप काही पणास लागले आहे.
यूएईसह ९ अतिथी देशांचे विदेशमंत्रीही पोहोचले यूएईच्या विदेशी प्रकरणांचे मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नाहयान जी-२० विदेशमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारतात आले.
फ्रान्स आणि जर्मनीच्या विदेशमंत्र्यांत चर्चा बैठकीदरम्यान फ्रान्सच्या विदेशमंत्री कॅथरीन कोलोना(डावीकडे) आणि जर्मन विदेशमंत्री एनालेना बेयरबॉक यांनी चर्चा केली.
मोदींनी मोठ्या जागतिक परिस्थितीचे मूल्यांकन केले : रशिया रशियाचे विदेशमंत्री लावरोव्ह म्हणाले, मोदींनी मोठ्या जागतिक परिस्थितीचे आकलन केले. ते पाश्चिमात्यांप्रमाणे विशेष परिस्थितीबाबत बोलले नाहीत.
भारत भविष्य आहे : जेम्स क्लेव्हरली ब्रिटिश विदेशमंत्री जेम्स क्लेव्हरली म्हणाले, भारत भविष्य आहे. आम्ही ब्रिटन-भारताच्या युवांसाठी एकमेकांकडे काम करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
भारतासाेबतचे संबंध महत्त्वाचे : चीन चिनी परराष्ट्र मंत्रालयाने विदेशमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सांगितले की, चीन भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व देताे. बळकट संबंध दोघांच्या हिताचे आहेत.
जागतिक संकटात भारताची भूमिका आवश्यक : फ्रान्स फ्रान्सच्या विदेशमंत्री कॅथरिन कोलोना म्हणाल्या, जी-२०साठी एक महत्त्वाचा क्षण आहे. भारतीय अध्यक्षतेची भूमिका खूप आवश्यक आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यच्या दृष्टिकोनामुळे आपणास आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.