आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन ब्रँडच्या नकली सामानाची विक्री होत असल्याच्या सतत मिळणाऱ्या तक्रारीनंतर अमेरिकेच्या व्यापार प्राधिकरणाने भारतातील तीन बाजारांना काळ्या यादीत समाविष्ट केले. त्यात दिल्लीचा पालिका बाजार, मुंबईचा हिरा पन्ना बाजार, कोलकाताच्या किद्दरपूर बाजार यांचा समावेश आहे. ऑनलाइन क्षेत्रात इंडिया मार्ट, ई-कॉमर्स वेबसाइटला देखील काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले. या बाजारात अस्सल ब्रँडच्या तुलनेत दहापट कमी दराने नकली सामानाची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे.
महागडे ब्रँड खरेदी करू न शकणारे शेकडो लोक या बाजारातून सर्रासपणे हे नकली ब्रँड खरेदी करू लागले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व कपड्यासंबंधी उत्पादनांत अशी विक्री होत आहे. ग्लोबल ट्रेंड प्रतिनिधी कॅथरिन टाइ यांनी २०२१ मध्ये नकली सामान विक्री करणाऱ्या सर्व बाजारपेठांची माहिती गोळा केली. नकली व पायरेटेड वस्तूंची विक्री केल्याने त्याचा फटका जागतिक व्यापाराला बसू लागला आहे. अमेरिकेतील नवीन उद्योगाचे त्यामुळे नुकसान होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील श्रमिकांना देखील फटका बसत आहे. त्यांच्या अहवालात एकूण ४२ ऑनलाइन बाजार व इतर ३५ बाजारपेठांचा उल्लेख आहे. त्यात ट्रेडमार्क व कॉपीराइटचे सातत्याने उल्लंघन केले जात होते.
अमेरिकन अधिकारी ‘भास्कर’ला म्हणाले, पालिका बाजारसारख्या ठिकाणांमुळे बाजारमूल्य व अब्जावधींचे महागडे ब्रँड यांची प्रतिष्ठा मलिन करतात. अशा बाजारांना काळ्या यादीत टाकून अमेरिकन पर्यटकांना त्याबाबत सावध केले जाते. त्यांनी नकली ब्रँडच्या जाळ्यात अडकू नये तसेच अशा वस्तू खरेदी करू नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय व्यापार क्षेत्रातून हा दावा फेटाळण्यात आला. परंतु किद्दरपूर (कोलकाता) येथील बाजारपेठेत नकली सौंदर्य प्रसाधनांमुळे अनेक लोकांच्या डोळ्यांना त्रास जाणवला. त्वचेसंबंधी आजारही उद्भवले. तशा तक्रारीही आल्या होत्या.
चीनमधून सर्वाधिक ७८ टक्के नकली वस्तू झाल्या जप्त
जागतिक पातळीवर अमेरिकेचे २.५ टक्के बनावट वस्तूंची विक्री होते. त्याची किंमत सुमारे ३७ लाख कोटी रुपये होते. सर्वाधिक नकली वस्तूंचे उत्पादन चीनमध्ये होते. चिनी उद्योजक समुद्रमार्गे बनावट वस्तू भारतात पाठवतात. हाँगकाँगमार्गे ते पाठवले जाते. एका छाप्यात ७८ टक्के बनावट वस्तू चीनमधून जप्त केल्या गेल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.