आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • India On Alert | ISIS K Hopes To Export Jihad In India Intelligence Community On Alert After Kabul Blast; News And Live Updates

भारतावर ISIS-K चा वाढला धोका:गुप्तचर संस्थांनी जारी केले अलर्ट; तालिबानी राजवटीत ISIS-K भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता, दक्षिण आशियात वाढू शकतात दहशतवादी कारवाया

नवी दिल्ली/काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कट्टरपंथी संघटना डोके वर काढू शकतात

अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी ताबा मिळवताच देशात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. गुरुवारी अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमधील फिदाईनमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या फिदाईन हल्ल्यात 170 लोक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS-K (खोरासन ग्रुप) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून भारतावर ISIS-K चा धोका वाढला आहे. ही संघटना दक्षिण आशिया आणि नंतर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. इसिस खोरासनला कट्टरपंथी इस्लामी राजवट लादण्याची इच्छा आहे.

जिहाद निर्यात करण्याचा कट
ISIS-K ला IS-K म्हणजे इस्लामिक स्टेट खोरासन असेही म्हणतात. ही संघटना तालिबान आणि अल-कायदापेक्षाही धर्मांध मानली जाते. हा गट भारत देशात जिहादी मानसिकता वाढवू शकतो अशी भीती भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांना आहे. हा संघटन मध्य आशिया आणि नंतर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांना त्यांच्या संघटनेशी जोडणे आणि नंतर दहशतवादी हल्ले करणे हा संघटनेचा हेतू आहे. कारण यापूर्वी केरळ आणि मुंबईतून अनेक तरुण इसीसमध्ये सामील झाले होते. त्यामुळे ही संघटना भारतात ही पसरु शकते अशी भीती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच देशातील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

कट्टरपंथी संघटना डोके वर काढू शकतात
एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, जर या गटाने षडयंत्र रचले तर भारतातील काही कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना पुन्हा डोके वर काढू शकतात. कारण हा दहशतवादी संघटन देशातील तरुणांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर अनेक दहशतवादी संघटनांना नवीन बळ मिळाले आहे. भारतातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने सांभाळली आहे. त्यामुळे या संघटना पुन्हा एकदा देशात आपले डोके वर काढू शकतात.

काबूल हल्ला हा तालिबानला संदेश
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी काबूलमध्ये झालेला हा दहशतवादी हल्ला तालिबानला एकप्रकारे संदेश आहे. खोरासन समूहालाही तालिबान सरकारमध्ये आपला वाटा हवा आहे. ही संस्था 2014 मध्ये समोर आली असून त्यानंतर ही एक अतिशय दुष्ट संघटना म्हणून ओळखली गेली. विशेष म्हणजे हक्कानी नेटवर्क आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI शी त्याचे संबंध आहेत.

बातम्या आणखी आहेत...