आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन-पाकने उकसावल्यास भारतीय लष्कर कारवाई करू शकते:US च्या अहवालात दावा- चर्चा असूनही चीनशी भारताचे संबंध बिघडतील

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काळात भारताचे चीन आणि पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले जातील. चीन आणि पाकिस्तानला लष्करी कारवाईने भारताकडून प्रत्युत्तर दिले जाईल, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे.

मागील सरकारांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चीन आणि पाकिस्तानच्या कोणत्याही चिथावणीखोर कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारत आपले सैन्य तैनात करू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

2020 मध्ये, जेव्हा भारत-चीन सैन्यामध्ये गलवानमध्ये तणाव वाढला. तेव्हा दोन्ही देशांनी पेट्रोलिंग पॉइंट -15 जवळ आपले सैन्य तैनात केले होते.
2020 मध्ये, जेव्हा भारत-चीन सैन्यामध्ये गलवानमध्ये तणाव वाढला. तेव्हा दोन्ही देशांनी पेट्रोलिंग पॉइंट -15 जवळ आपले सैन्य तैनात केले होते.

चर्चा होऊनही भारत-चीन संबंध बिघडतील
बाह्य धोक्यांचा वार्षिक मूल्यांकन अहवाल यूएस संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात म्हटले आहे की, चीन आणि भारत सीमेवर सुरू असलेला वाद चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, असे असूनही दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होणार आहे.

भारत-पाकिस्तानबाबत अहवालात दावा
भारत-पाक संबंधांमध्ये तणाव वाढण्यामागे काश्मीर हे महत्त्वाचे कारण असल्याचे अमेरिकन गुप्तचरांनी मानले आहे. अहवालात असे लिहिले आहे की, 2021 मध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या युद्धविराम करारानंतर दोन्ही देशांना संबंधांमध्ये शांतता राखायची आहे.

मात्र, भारतविरोधी दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतही पाकिस्तानच्या कोणत्याही चिथावणीखोर कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल.

अहवालात आणखी काय म्हटले आहे?

1. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संकटाचे वर्णन एक प्रमुख चिंतेचे आहे.

2. दोन्ही देशांमध्‍ये एकमेकांच्‍या विरोधात सुरू असलेल्‍या वादांमुळे निर्माण झालेली विचारसरणी तणाव वाढण्‍याची भीती वाढवते.

3. दोन्ही देशांमधील तणावामुळे काश्मीरमध्ये हिंसाचार आणि भारतात दहशतवादी हल्ला झाला तर दोन्ही देशांमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.

अतिरेक्यांशी चकमक झाल्यानंतर उभे असलेले भारतीय लष्कराचे जवान. (फाइल फोटो)
अतिरेक्यांशी चकमक झाल्यानंतर उभे असलेले भारतीय लष्कराचे जवान. (फाइल फोटो)

भारत-चीन वाद अमेरिकेसाठी धोका
2020 मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेला संघर्ष हा या दशकातील सर्वात धोकादायक संघर्ष असल्याचे वर्णन अमेरिकेच्या इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती अमेरिका आणि तेथील जनतेसाठी मोठा धोका असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला. दोन्ही देशांमधील वाढत्या वादात अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या राज्य विभागाचे प्रवक्ते काय म्हणाले?
हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेच्या राज्य विभागाचे प्रवक्त्याने यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, दहशतवाद आणि अतिरेक्यांना सामोरे जाण्यासाठी किती गंभीर आहोत हे आमच्या पाकिस्तानसोबतच्या दहशतवादविरोधी संवादावरुन दिसून येते.

पाकिस्तानातील दहशतवादाची समस्या दक्षिण आशियाबाहेरही पसरू शकते, असे ते म्हणाले. दक्षिण आणि मध्य आशियात शांतता प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश आहे.

वृत्तसंस्थेनुसार, सैन्य हिवाळ्यात उंचावर असलेल्या भागात अनेक खेळांचे आयोजन करते, आर्मीचे सैनिक आइस हॉकी खेळतात.
वृत्तसंस्थेनुसार, सैन्य हिवाळ्यात उंचावर असलेल्या भागात अनेक खेळांचे आयोजन करते, आर्मीचे सैनिक आइस हॉकी खेळतात.

चीनच्या सीमेवर लष्कराच्या हालचाली वाढल्या

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच चीन सीमेवरील LAC वर पाळत वाढवली आहे. वृत्तसंस्थेनुसार, लडाखमध्ये तैनात लष्कराचे जवान गलवान घाटी आणि आसपासच्या भागात घोड्यांसह गस्त घालत आहेत. या भागांत माल नेण्यासाठी खेचरही नेले जात आहेत.

इथे लष्कराचे काही फोटोही समोर आले आहेत. ज्यात गलवान भागात सैनिक क्रिकेट आणि आईस हॉकी खेळत आहेत. भारतीय लष्कराने या ठिकाणांची नावे उघड केली नाहीत, परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की हे तेच ठिकाण आहे जिथे 15-16 जून 2020 च्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती.

भारत आणि चीन सीमेवर परिस्थिती अनिश्चित

भारत आणि चीनदरम्यानही दीर्घकाळापासून सीमाविवाद सुरू आहे. भारताच्या लडाख आणि अरुणाचलमधील मोठ्या भागावर चीन दावा करत आला आहे. चीनच्या या विस्तारवादी भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यातच चीनच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असली तरी अनिश्चित अर्थात असल्याचे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले. तसेच दोन सशस्त्र दलांमधील सातपैकी 5 मुद्दे सोडवण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...