आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची पाकमध्ये जाऊन आगळिक:म्हटले-काश्मीर मुद्द्यावर भारत-पाकने चर्चेतून तोडगा काढावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यातील एससीओ बैठकीनंतर चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग पाकिस्तानात गेले. तिथे त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंची भेट घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. भारत आणि पाकिस्तानात दीर्घ काळापासून काश्मीर मुद्द्यावरून वाद सुरू आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रस्ताव आणि द्विपक्षीय करारांच्या आधारे या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा. सोबतच दोन्ही देशांनी काश्मीरवर कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये असे किन गँग म्हणाले.

गँग हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेले आहेत. त्यांचा हा पहिलाच पाक दौरा आहे. शनिवारी त्यांनी बिलावर भुट्टोंची भेट घेतली. इस्लामाबादमधील पाकिस्तान-चीन सामरिक चर्चेची चौथी फेरी संपुष्टात आल्यानंतर दोन्ही बाजूंकडून वक्तव्य जारी करण्यात आले.

पाक व चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली
पाक व चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली

युएन चार्टरच्या आधारे तोडगा काढावा - चीन

काश्मीर वादावर युएन चार्टर, सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि द्विपक्षीय करारांच्या आधारे तोडगा काढायला हा असे गँग म्हणाले. एकतर्फी निर्णयाने परिस्थिती बिघडू शकते. सोबतच दोन्ही मंत्र्यांनी सीपेकविषयीही कटिबद्धता व्यक्त केली. आर्थिक विकास आणि रोजगारासाठी हे एक चांगले पाऊल असल्याचे ते म्हणाले.

चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान शेजारी देश आहेत. पाक-अफगाणिस्तानने मिळून द्विपक्षीय संबंध सुधारायला हवे असे ते म्हणाले. तालिबान सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबरीचे अधिकार देईल अशी आम्हाला आशा आहे असेही ते म्हणाले.

द्विपक्षीय बैठकीत सीपेकवर चर्चा करण्यात आली.
द्विपक्षीय बैठकीत सीपेकवर चर्चा करण्यात आली.

पीओकेतून जाणाऱ्या सीपेकवर झाली चर्चा

यानंतर बिलावल भुट्टो म्हणाले- यावर्षी सीपेकला एक दशक पूर्ण होईल. यामुळे पाकिस्तानात सामाजिक-आर्थिक विकास, रोजगार आणि लोकांचे जीवन चांगले झाले आहे. चीनच्या सहकार्याने 60 अब्ज डॉलर खर्चून उभारले जाणारे सीपेक ही एक वसाहत आहे. ती पाकव्याप्त काश्मिरातून जाते. भारताकडून याला सातत्याने विरोध केला जात आहे. कारण या माध्यमातून चीनला थेट अरबी समुद्रापर्यंत मार्ग उपलब्ध होणार आहे.

याआधी शुक्रवारी गोव्याहून परतल्यानंतर बिलावल भुट्टो म्हणाले होते की, आमचा भारत दौरा यशस्वी राहिला. आम्ही प्रत्येक मुस्लिमाला दहशतवादी मानण्याची आरएसएस आणि भाजपची विचारसरणी नाकारली. भारतात असुरक्षिततेची भावना आहे. जगातील सर्व मुस्लीम दहशतवादी असल्याचे मिथक पसरवण्याचा प्रयत्न आरएसएस आणि भाजपकडून केला जात असल्याचेही ते म्हणाले. हे मिथक मोडून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला असे ते म्हणाले.

एससीओ बैठकीच्या दुसऱ्या दिवशी एस जयशंकर आणि बिलावल भुट्टो
एससीओ बैठकीच्या दुसऱ्या दिवशी एस जयशंकर आणि बिलावल भुट्टो

पाकिस्तान दहशतवादाचा कारखाना - जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शुक्रवारी गोव्यातील बैठकीनंतर म्हणाले की, आमच्या देशाने दहशतवाद झेलला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारेच याने पीडित असल्याचे ढोंग करत आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची प्रतिष्ठा त्यांच्या खजिन्याप्रमाणे रिकामी आहे असेही जयशंकर म्हणाले. पाकिस्तान हा जगभरातील दहशतवादाच्या कारखान्याचा प्रमोटर असल्याचीही टीका जयशंकर यांनी केली.