आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
व्हॉट्सअॅप-फेसबुकसारख्या अॅप्सच्या प्रायवेसीवर सुरू असलेल्या कंट्रोवर्सीदरम्यान पाकिस्तानी दहशतवादी नवीन डावपेच आखत असल्याचे समोर आले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भरती आणि तरुणांना भडकवण्यासाठी पाकिस्तान दहशतवादी संघटना आणि हँडलर्स नवीन अॅपचा वापर करत आहेत. यात तुर्कीमधील कंपनीने तयार केलेल्या अॅपचा समावेश आहे. हे अॅप स्लो इंटरनेटवरही(2G) काम करू शकते.
वृत्त संस्थांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, एनकाउंटरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या सामनातून आणि आत्मसमर्पण केलेल्या दरशतवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे समजले की, दहशतवादी तीन नवीन अॅप्सचा वापर करत आहेत. परंतु, अधिकाऱ्यांनी त्या अॅप्सचे नाव सांगण्यास नकार दिला.
अमेरिका आणि यूरोपच्या अॅप्सचा समावेश
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या 3 अॅप्सबद्दल पकडलेल्या दहशतवाद्यांनी माहिती दिली, यातील एक अॅफ अमेरिकन आणि एक अॅप यूरोपमधील कंपनीने तयार केले आहे. सध्या ज्या अॅपचा वापर दहशतवादी करत आहेत, त्याला तुर्कीमध्ये तयार केले आहे. दहशतवादी याचा वापर काश्मीरमध्ये नवीन दहशतवाद्यांना भरती करण्यासाठी करत आहेत.
दहशतवाद्यांकडून फ्री अॅपचा वापर
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी संघटनांनी व्हॉट्सअॅप-फेसबुकचा वापर बंद केला होता. नंतर समजले की, ते इंटरनेटवर उपलब्ध काही फ्री अॅपचा वापर करत आहेत. सुत्रांनी सांगितलेल्यानुसार, अशा अॅपमध्ये इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन थेट डिव्हाइसवर होते. त्यामुळे, थर्ड पार्टीचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. असे अॅप इन्क्रिप्शन एल्गोरिथ्म RSA-2048 चा वापर करतात, जे सर्वात सुरक्षित इन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आहे. RSA एक अमेरिकन नेटवर्क सिक्योरिटी आणि ऑथेंटिकेशन कंपनी आहे. याचा वापर संपूर्ण जगात क्रिप्टोसिस्टममध्ये 'फाउंडेशन की'साठी केला जातो.
नवीन अॅपमध्ये फोन नंबर किंवा ईमेलची गरज नाही
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी ज्या अॅप्सचा वापर करत आहेत, त्यात कोणत्याही फोन नंबर किंवा ईमेल आयडीची गरज नाही. आता काश्मीरमध्ये असे अॅप बंद करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.