आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुत्तो यांना फटकारले:संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावरून बिलावल भुत्तो यांना भारताने फटकारले

संयुक्त राष्ट्रे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिलादिनी संयुक्त राष्ट्रात भारताच्या कायम सदस्य रुचिरा कम्बोज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांना चांगलेच फटकारले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत महिला, शांतता आणि सुरक्षेवर चर्चा सुरू होती. यादरम्यान बिलावल यांनी काश्मीरचा राग आळवला. यानंतर भारताच्या रुचिरा म्हणाल्या की, पाकिस्तानकडून बाष्कळ बडबड करण्यात आली आहे. आम्हाला यावर उत्तर देणे आवश्यक वाटत नाही.

सुरक्षा परिषदेच्या या बैठकीत प्रत्येक देशाची बाजू त्याचा कायम सदस्य मांडत असतो. विशेष म्हणजे, पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी त्यांचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो स्वत: आले. बिलावल यांनी महिला, शांतता आणि सुरक्षेवर होणाऱ्या बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि भारतावर अनेक आरोप केले. त्याला रुचिरा यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, पाकिस्तानच्या प्रतिनिधीने जो आरोप केला आहे त्याला उत्तर देणे आम्ही योग्य समजत नाहीत. हे चुकीच्या हेतूने खोटे पसरवले जात आहे. यामागे राजकीय उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...