आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे परराष्ट्र मंत्री आणि सरन्यायाधीशांना भारताचे निमंत्रण:SCO शिखर परिषदेसाठी बोलावले, रशिया आणि चीन देखील उपस्थित राहणार

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO)शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताला SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे संघटनेच्या महत्त्वाच्या बैठका भारतात होणार आहेत. मात्र, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि सरन्यायाधीशांनी अद्याप हे निमंत्रण स्वीकारलेले नाही.

हा फोटो पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचा आहे.
हा फोटो पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचा आहे.

SCO च्या बैठका मार्च आणि मे मध्ये होणार
पाकिस्तानच्या नेत्यांनी जर हे आमंत्रण स्वीकारले तर पाकिस्तानमध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेले लोक भारताला भेट देण्याची अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. भारतात होणाऱ्या SCO बैठकीत चीन आणि रशियासह 8 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. SCO देशांच्या मुख्य न्यायमूर्तींची मार्चमध्ये तर परराष्ट्र मंत्र्यांची मे महिन्यात बैठक होणार आहे. भारतातील SCO सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक गोव्यात होणार आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, भारताने पाठवलेल्या निमंत्रणाला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश आणि परराष्ट्र मंत्री स्वतः भारतात येण्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात.

2016 मध्ये केला होता पाकच्या सरन्यायाधीशांनी दौरा रद्द
यापूर्वी 2016 मध्ये पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश अन्वर झहीर जमाली यांनी आपला भारत दौरा रद्द केला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला होता. जमाली यांनी पत्र लिहून सांगितले होते की, सध्याच्या परिस्थितीत ते भारतात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत.

बिलावल भुट्टो यांचे वादग्रस्त विधान

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारतात येण्याची शक्यता कमी आहे. 15 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर बिलावल भुत्तो यांनी नरेंद्र मोदी यांना ‘गुजरातचे कसाई’ म्हटले होते. बिलावल भुत्तो यांच्या या वक्तव्याचा भारताने निषेध केला. बिलावल भुट्टो म्हणाले होते की, ओसामा बिन लादेन मेला आहे, पण गुजरातचा कसाई अजूनही जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. भुट्टो यांच्या या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, भुट्टो कदाचित 1971 विसरले आहेत. तर भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, बिलावल हे एका अयशस्वी देशाचे प्रतिनिधी आहेत आणि ते स्वतःही अपयशी ठरले आहेत. दहशतवादी मानसिकता असलेल्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो.

2015 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर पंतप्रधान मोदींसोबत नवाझ शरीफ हे दिसत आहेत.
2015 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर पंतप्रधान मोदींसोबत नवाझ शरीफ हे दिसत आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची शेवटची भारत भेट
पाकिस्तानचे पंतप्रधान अनेक वर्षांनंतर 2014 साली शेवटच्यांदा भारतात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याकडे दोन्ही देशांमधील एक नवीन सुरुवात म्हणून पाहिले जात होते. मात्र, तसे झाले नाही. नवाझ शरीफ यांच्या भारत भेटीनंतर 2015 मध्ये पीएम मोदींनीही पाकिस्तानला भेट दिली होती.

भारत, पाकिस्तान, चीन, रशिया या चौकडीचा समावेश असलेले SCO नेमके काय करते? अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या NATO सोबत याची तुलना का केली जाते? भारतासाठी या वेळची बैठक महत्त्वाची का आहे? हे आपण दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेणार आहोत... येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...