आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीजिंग :जी-7 मध्ये सहभागी होऊन भारत आगीशी खेळू पाहतोय, भारताच्या संभाव्य समावेशावरून चीनचा तिळपापड

बीजिंगएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जी-7 चा विस्तार म्हणजे चीनला शह देण्याचा प्रकार असल्याचे चिनी दैनिकांनी म्हटले आहे

पूर्व लडाखमध्ये भारत व चीनदरम्यान सध्या सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी शनिवारी दोन्ही लष्कराच्या जनरल रँकचे अधिकारी भेटत आहेत. मात्र, या बैठकीपूर्वी चीनने भारताच्या जी-७ राष्ट्रांतील सहभागावरून धमकावले असून या माध्यमातून भारत आगीशी खेळत असल्याचे म्हटले आहे. जी-७मध्ये भारताला सहभागी करून घेण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. जी-७चा विस्तार म्हणजे चीनला शह देण्याचा प्रकार असल्याचे चिनी दैनिकांनी म्हटले आहे. चीनला आव्हान देण्यासाठीच भारताला पुढे करून जी-७ मध्ये स्थान दिले जात असल्याचे यात नमूद आहे. भारत-चीन तणावात जी-७मध्ये सहभागी होत महाशक्ती म्हणून भारत चीनला चोख प्रत्युत्तर देऊ पाहत असल्याचेही या वृत्तपत्रांनी म्हटले आहे.


आज चुशूलमध्ये चर्चा

लेहमध्ये तैनात १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्ट. जनरल हरिंद्रसिंग भारताच्या वतीने शनिवारी होत असलेल्या बैठकीत सहभागी होत आहेत. चीनच्या वतीने तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर बैठकीत असतील. सकाळी ८ वाजता चुशूलमध्ये ही बैठक सुरू होईल. मात्र, यातून ठोस असा काही तोडगा निघण्याची शक्यता नाही.

0