आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामाबाद:कुलभूषण जाधव प्रकरणात नवा वकीलनेमण्याची भारतास संधी द्यावी, पाक सरकारला काेर्टाचे आदेश

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कान उपटले

कुलभूषण जाधव प्रकरणात न्यायालयाने पाकिस्तान सरकारचे पुन्हा कान उपटले. फेरविचारसंबंधी याचिकेबाबत भारताला वकील नेमण्यासाठी आणखी एक संधी देण्यात यावी, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत. भारताला आदेशाबद्दल माहिती कळवण्यात यावी. तूर्त सुनावणी ३ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावली आहे. त्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवून दाेषी ठरवण्यात आले. अॅटर्नी जनरल खालिद जावेद खान म्हणाले, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानने काउन्सुलर अॅक्सेसची परवानगी दिली आहे. पाकिस्तानने आयसीजेच्या आदेशाचे पालन करताना भारताला काउन्सलर पोहोच दिली. भारताने वकील नियुक्त करण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावाला अद्याप भारताने काहीही उत्तर दिले नाही, असे जनरल खालिद जावेद खान यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला वकील नेमण्यासाठी भारताला संधी दिली जावी. त्याबद्दल भारताला कळवण्याचे आदेश दिले. त्याचबराेबर ३ आॅक्टाेबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

दरम्यान, बलुचिस्तानमध्ये ३ मार्च २०१६ राेजी जाधव यांना अटक करण्यात आली हाेती, असा दावा पाकिस्तानने केला आहे. परंतु वास्तविक जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले हाेते. नाैदलातून निवृत्त झाल्यानंतर ते इराणमध्ये व्यवसाय करत हाेते. जाधव यांच्या भेटीसाठी भारताने आंतरराष्ट्रीय काेर्टाकडे धाव घेतली हाेती. त्यानंतर पाकिस्तानने काउन्सलर अॅक्सेसची तयारी दर्शवली हाेती. त्याशिवाय लष्करी न्यायालयाने दिलेल्या निकालासदेखील स्थगित केले हाेते.जाधव खटल्यात फेरविचार याचिकेसाठी परवानगी मिळावी यासाठी आयसीजेच्या आदेशानुसार विशेष कायदा तयार करण्यात आला. जाधव यांना मृत्यूदंड दिल्याच्या निकालाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टाकडे धाव घेतली होती.

पाकचा दुसरा डाव हाणून पाडला भारताने मानले आभार
संयुक्त राष्ट्र । संयुक्त राष्ट्रामध्ये भारतविरोधी कारस्थान करताना पाकला पुन्हा एकदा अपयश आले आहे. दोन भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकचा इरादा हाणून पाडण्यात आला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंधक समितीकडे दहशतवादी घोषित करण्यासाठी भारतीय अंगारा अप्पाजी व गोविंद पटनायक ही नावे पाठवली होती. परंतु अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व बेल्जियमने बुधवारी हा डाव हाणून पाडला. त्याबद्दल भारताने सर्व समर्थक राष्ट्रांचे आभार व्यक्त केले.