आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानने पाकला फटकारले, भारताला ठरवले उपयुक्त:अफगाणिस्तानच्या नगरविकासात भारताने पैसा गुंतवावा : तालिबान

काबूल/ दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास १६ महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबान शासनाला जगाने मान्यता दिली नाही. त्यांची स्थिती वाईट आहे. त्यातून सावरण्यासाठी ते भारताची मदत मागू इच्छित आहेत. याच कारणाने तालिबान सरकारने भारताकडे गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनुसार, भारताने सागरी किनारा नसलेल्या अफगाणिस्तानात रस्त्यासारख्या पायाभूत योजनांमध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये खासगी क्षेत्रही समाविष्ट केले जावे. अशा प्रकल्पांतील गुंतवणुकीमुळे रोजगार निर्माण होतील आणि यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तालिबान नेत्यांचे आर्जव नुकतेच भारतीय तंत्रज्ञान मिशन प्रमुखांच्या बैठकीदरम्यान केले. यामध्ये तालिबान शासनाने सांगितले की, भारतीय व्यावसायिकांनी शहर तसेच रहिवासी विशेषत: न्यू काबूल सिटी योजनेत आपले भूमिका बजवावी.

दुसरीकडे, तालिबान राजवटीत पाकिस्तान मागे पडत आहे. त्यांना अपेक्षा होती की, तालिबान राजवटीत ते पडद्याआडून राज्य करतील. यासाठी त्यांनी उघड मदत केली. त्यानंतर सद्यस्थिती त्यांची स्थिती वाईट झाली.

भारताच्या २० योजना सुरू होतील : वृत्तवाहिनी टोलो न्यूजच्या दाव्यानुसार, अफगाणिस्तानात भारताच्या रखडलेल्या २० योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने सांगितले की, भारतीय प्रभारी भारतकुमारांनी संबंध सुधारणे आणि अफगाणिस्तानात दिल्लीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात भारताने रस दाखवला. कुमार यांनी नगर विकास व गृहनिर्माणमंत्री हमदुल्ला नोमानी यंाच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ही टिप्पणी केली. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानच्या सत्तास्थापनेनंतर भारताला आपले प्रकल्प बंद करावे लागले होते. त्याआधी भारताने २ दशकांत अफगाणिस्तानात २५ हजार कोटी रुपयंाची गुंतवणूक केली आहे.

पाकची पिछाडी : पाकिस्तान सीमेवर गोळीबाराची स्थिती, टीटीपीने हल्ले वाढवले काबूलमध्ये पाकिस्तानी राजदूतास मारण्याचा प्रयत्न अफगाणिस्तान - पाकिस्तान सीमेवर तणाव आणि गोळीबाराची स्थिती आहे. तालिबानने पाकिस्तानला विभक्त करणारी डुरंड रेषा मान्य करण्यास नकार दिला आहे. तालिबान राज्यात तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी) अतिरेक्यांनी पाकिस्तानवरील हल्ला वाढवला आहे. काबूलमध्ये पाकिस्तानी राजदूताला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.

बळकट : जपानने दूतावास उघडण्यात भारताचे मत घेतले गेल्या काही दिवसांत भारताने खूप वेगाने तालिबान सरकारवर आपली पकड मजबूत केली आहे. भारताने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता जपानही अफगाणिस्तानात दूतावास सुरू करत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, जपानने या संदर्भात भारताचा सल्लाही घेतला आहे. तेथील वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी जपानने हा संपर्क साधला आहे.

चीनसोबत सिल्क रोडवर चर्चा तालिबान अर्थव्यवस्थेत मदत करण्यासाठी प्राचीन सिल्क रोड व्यापारी मार्ग नव्याने सुरू करण्यासाठी चीनशी चर्चा करत आहे. वृत्तानुसार, तालिबानचे उद्योग-वाणिज्यमंत्री नूरुद्दीन अजीजी यांनी या वेळी चीनला वेगवान प्रयत्न करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...