आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्धावर भारताचे खडेबोल:UN मध्ये नेदरलँडने मतदानात सहभागी होण्यास सांगितले; भारत म्हणाला -आम्ही काय करावे हे सांगू नका

न्यूयॉर्क18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने संयुक्त राष्ट्रात नेदरलँडच्या राजदूतांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. यूनोतील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले -तुम्ही भारताने काय करावे व काय करू नये हे सांगू नका. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सल्ल्याची गरज नाही. त्याचे झाले असे की, डच राजदूत कॅरल वन ओस्टोरम यांनी युक्रेनवरील भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते -भारताने महासभेतील मतदानावर बहिष्कार टाकण्याऐवजी आपली भूमिका स्पष्ट करुन यूएन चार्टरचा आदर केला पाहिजे.

युक्रेनच्या उप पंतप्रधानांच्या माहितीनुसार, या युद्धात 4600 जणांची मानवी कॉरिडोरच्या माध्यमातून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
युक्रेनच्या उप पंतप्रधानांच्या माहितीनुसार, या युद्धात 4600 जणांची मानवी कॉरिडोरच्या माध्यमातून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

बैठकीपूर्वी अधिकृत निवेदन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक शनिवारी सायंकाळी होणार आहे. तत्पूर्वी, तिरुमूर्ती यांनी एका ट्विटद्वारे आपली अधिकृत भूमिका जारी केली. ते म्हणाले...

  • भारताने सुरुवातीपासूनच युद्ध संपवून चर्चा व कूटनितिक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
  • भारताने बुचातील निष्पाप नागरिकांच्या हत्येचाही कठोर निषेध केला आहे.
  • भारताने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीचे आवाहन केले आहे.
  • आमच्या मते या संघर्षात कुणीही जिंकणार नाही. युद्ध सुरू असताना अन्य मार्ग दिसणार नाहीत. लोकांचा असाच बळी जात राहील.
  • संयुक्त राष्ट्राने मारियुपोलमधील नागरिकांची सुटका करण्याचे प्रशंसनीय काम केले आहे. यूनो अन्य क्षेत्रांतही असेच काम करेल, असा विश्वास आहे.

रशियाविरोधातील मतदानाला गैरहजेरी

भारत गत जानेवारीपासूनच रशिया-युक्रेनमधील तणावावरील मतदानावर तटस्थ भूमिका घेत आहे. तो यासंबंधीच्या कोणत्याही मतदानात सहभाग घेत नाही. एप्रिल महिन्यात मानवाधिकार परिषदेतून रशियाची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली होती. भारताने या मतदानातही सहभाग घेतला नव्हता.

तत्पूर्वी, मार्च महिन्यात युक्रेन व त्याच्या सहकारी देशांनी रशियाविरोधात एक प्रस्ताव सादर केला होता. त्यावरील मतदानालाही भारताने हजेरी लावली नव्हती. भारतासह एकूण 34 देश या मतदानापासून अंतर राखले होते.

बातम्या आणखी आहेत...