आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • India US Defence Latest News, 2+2 Dialogue Update: Michael Pompeo, Mark Esper | What IS BECA Agreement: Basic Exchange And Cooperation Agreement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

India-US 2+2 डायलॉग:अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले - गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 सैनिकांना श्रद्धांजली; आम्ही भारतासोबत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोम्पियो आणि एस्परने राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

भारत आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये तिसरी 2+2 बैठक दिलल्लीच्या हैदराबाद हाउसमध्ये सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये बेका म्हणजेच बेसिक एक्सचेंज अँड को-ऑपरेशन अॅग्रीमेंट पूर्ण झाला आहे. यामुळे भारत मिसाइल हल्ल्यासाठी विशेष अमेरिकी डेटाचा वापर करु शकेल. यामध्ये कोणत्याही परिसरातील अचूक भौगोलिक स्थान आहे.

यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो आणि संरक्षण मंत्री एस्पर यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पोम्पियो आणि मार्क एस्पर सोमवारी दिल्लीला पोहोचली होते. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एस्पर यांची हैदराबाद हाउसमध्ये भेट घेतली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पियोंसोबत चर्चा केली.

भेटीनंतर राजनाथ म्हणाले की, ही बैठक दोन्ही देशांमधील संरक्षण सहयोग व्यापक स्तरावर आणण्याच्या उद्देशाने झाली आहे. 2+2 वार्ता पहिलेच ठरलेली होती. मात्र भारत-चीन आणि अमेरिका-चीनमध्ये निर्माण झालेली कटूता पाहता याला चीनची घेराबंदी म्हणून पाहिले जात आहे. जयशंकर म्हणाले की, या बैठकीत दोन्ही देशांमधील रणनीतिक संबंधांच्या सामर्थ्यावर चर्चा झाली.

राजनाथ सिंह : अमेरिकेसोबत सैन्याचा सहयोग वाढवू
भारतीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटले - भारत आणि अमेरिकेमध्ये सैन्य कॉरपोरेशन वाढत आहे. समुद्री क्षेत्रातील सहयोगावर चर्चा झाली आहे. डिफेंस सेक्टरमध्ये आत्मनिर्भर भारत आपल्या अमेरिकेसह सहयोग केंद्रात आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि टेक्निक शेअर केली जाईल. आम्ही सर्व देशांची स्वतंत्रता, शांती आणि संप्रभुताचे समर्थक आहोत.

मार्क एस्पर : डिफेस कोऑपरेशननुसार टेक्नोलॉजी शेअर करू
अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले - भारतासोबत आम्ही सायबर आणि स्पेस डायलॉगवर चर्चा केली आहे. समुद्री क्षेत्रातील सुरक्षेवर चर्चा झाली. येणाऱ्या दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया, जापानसह मालाबारम्ये आम्ही एक्सरसाइजमध्ये सामिल होऊल. डिफेंस अॅग्रीमेंटनुसार जिओ स्पेस इन्फॉर्मेशन शेअरिंग करु. डिफेंस टॅक्नॉलॉजीला कोऑपरेशननुसार हेलिकॉप्टर, फायटर जेटवर चर्चा झाली.

माइक पोम्पियो : जग भाहत आहे की चीन लोकशाहीचा मित्र नाही
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले - दोन्ही देशांमध्ये संहयोग सातत्याने मजबूत होत आहे. आज वार मेमोरियल येथे गेले होते. येथे देशासाठी चीनच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या त्या 20 जवानांनाही श्रद्धांजली वाहिली. चीनची कम्युनिस्ट पार्टी लोकशाहीचे समर्थन करत नाही. चीन लोकशाही, कायदा, पारदर्शकताचा मित्र नाही आणि हे जग पाहत आहे. आम्हाला आनंद आहे की, भारत आणि अमेरिका केवळ चीनच नाही, तर प्रत्येक धोक्या विरोधात आपसातील सहयोग मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहे.

एस जयशंकर : क्रॉस बॉर्डर टेररिज्म मंजूर नाही
भारतीय परराष्ट्रमंत्री म्हणाले - अमेरिकेसह ग्लोबल स्ट्रॅटजिक पार्टनरशिपवर बोलणे झाले. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कोऑपरेशनवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी तयार आहेत. दोन्ही देशांनी ही गोष्ट मान्य केली आहे की, क्रॉस बॉर्डर टेररिज्मला स्वीकार करणार नाही.