आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन सिनेटमध्ये(संसद) ८५८ अब्ज डॉलर म्हणजे, ७१ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खर्च अधिनियमास मंजुरी दिली. यामध्ये भारतासोबत संरक्षण करारावर भर दिला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियमाच्या(एनडीएए) कलम १२६० नुसार, भारतासोबत संरक्षण सहकार्याअंतर्गत गुप्तचर माहिती संकलन, अत्याधुनिक वायरलेस संचार सुविधा, चौथ्या-पाचव्या पिढीतील विमाने, ड्रोन पुरवठा, हिवाळ्यातील बचावासाठी संरक्षण उपकरणाच्या पुरवठ्यांचा समावेश आहे. सिनेटमध्ये या अधिनियमाच्या बाजूने ३५० आणि विरोधात ८० मते पडली होती. आता ते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे पाठवले जाईल. त्यांच्या स्वाक्षरीनंतर त्यातील बाबींची अंमलबजावणी केली जाईल. हे लागू झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत भारतीय संरक्षण मंत्रालयासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादात भारताचे हे मोठे यश मानले जात आहे. याशिवाय अमेरिकेचा उद्देश भारत रशियाच्या शस्त्रावरील अवलंबित्व कमी करेल,असा आहे. त्यासाठी एनडीएएने संरक्षण सचिव म्हणाले,अधिनियम लागू झाल्याच्या १८० दिवसांत भारताचे रशियावरील अवलंबित्व कमी झाला नाही याचा अहवाल त्यांनी द्यायचा आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतरच अमेरिका आणि रशियातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. परिणामी, अमेरिका रशियासोबत भारताचे संबंध कमकुवत करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेने चीनविरोधात मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. चीनकडून वारंवार अमेरिकेत ड्रोन पाठवले जातात. अशा स्थितीत अमेरिकेने निश्चित केले की, ते याचे विश्लेषण करतील आणि चीनचा कट निष्फळ करू. एवढेच नव्हे तर चीनकडून आयात वाहनांचीही कठोर तपासणी केली जाईल. अमेरिकेला संशय आहे की, चीनहून येणाऱ्या गाड्यांमध्ये हेरगिरीची उपकरणे असू शकतात. चीनवर लष्करी निर्बंध लादणे आणि जिथून-जिथून तो अत्याधुनिक शस्त्र खरेदी करत आहे, त्यांच्यावरही निर्बंध लादण्याबाबत बोलले जात आहे. गेल्या ५ वर्षांत अमेरिका-भारत संबंध सुधारले आहेत.
युक्रेनला ८० कोटी डॉलरची मदत
अमेरिकी सिनेटने २०२३ साठी ८५८ अब्ज डॉलरच्या संरक्षण खर्चाच्या विधेयकास मंजुरी दिली आहे. यात ८० कोटी डॉलरची मदत युक्रेनला मिळेल. ही बायडेन यांच्या मागणीपेक्षा ५० कोटी डॉलर जास्त आहे. अमेरिकेने युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र देण्याची घोषणा केल्याने रशिया संतापला आहे. अमेरिकेने दरमहा युक्रेनच्या ५०० सैनिकांना अत्याधुनिक युद्ध प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनच्या ३००० पेक्षा जास्त सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.