आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्विपक्षीय संबंध:भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध विस्तारणार, मोदी-बायडेन चर्चेत शिक्कामोर्तब

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरिन तेई व केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यात नुकत्याच झालेल्या एका डिजिटल बैठकीत द्विपक्षीय व्यापारी संबंधाचा विस्तार करण्यावर सहमती झाली आहे. व्यापारविषयक धोरणावर उभय देशांनी एकत्र येऊन चर्चेची तयारी दर्शवली आहे. राजदूत तेई याच महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा असेल. हा दौरा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. बुधवारी उभय नेत्यांमध्ये झालेल्या डिजिटल बैठकीनंतर तेई म्हणाल्या, दिल्लीत आगामी बैठकीबद्दल आम्ही उत्सुक आहोत. या बैठकीत जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय संमेलनात चांगले निष्कर्ष यावे यासाठी भारत व अमेरिका यांच्यात विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली. जागतिक व्यापार परिषदेचे संमेलन ३० नोव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेकडून या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार राजदूत तेई व उपप्रतिनिधी साराह बँची टोकियो, सेऊल व नवी दिल्लीचा दौरा करतील, असे निश्चित करण्यात आले होते.

हॅरिस यांच्यासोबत तणाव : अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन व उप प्रमुख कमला हॅरिस यांच्यातील संबंधात दरी वाढल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच दोन्ही नेते काही कार्यक्रम वगळता एका मंचावर दिसून येत नाहीत. फेब्रुवारीत बायडेन व हॅरिस ३८ वेळा सोबत दिसले होते. ऑक्टोबरमध्ये मात्र उभय नेते केवळ आठ वेळा एकत्र आले होते. हॅरिस यांनी बायडेन यांच्यापासून अंतर राखल्याचे सूत्रांनी सांगितले. हॅरिस यांच्याकडे स्थलांतरितांबाबत काम सोपवण्यात आल्यानंतर ही दरी वाढल्याचे बोलले जाते.त्यामुळे भारतीय समुदायाच्या हितसंबंधावर देखील परिणाम होऊ शकतो.

मोदी-बायडेन चर्चेत शिक्कामोर्तब
भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय चर्चेला गती देण्याचे काम सप्टेंबर महिन्यात झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापार संबंधात विस्तार करण्यावर सहमती झाली होती. त्यातही गुंतवणुकीच्या क्षेत्रात दोन्ही देशांचा जास्त कल असल्याचे दिसून आले होते. या बैठकीनंतर २४ सप्टेंबर रोजी व्हाइट हाऊसकडून संयुक्त पत्र जाहीर करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...