आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • India Vs China Force Updates: India's Proposal Possible In East Ladakh: China; News And Live Updates

बीजिंग:पूर्व लडाखमध्ये भारताच्या प्रस्तावावर चर्चा शक्य : चीन; आज कोर कमांडरस्तरीय बैठक अपेक्षित

बीजिंग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही देशांतील सहमतीच्या आधारे भारतीय दल चीनसोबत काम करेल, अशी अपेक्षा परराष्ट्र विभागाने व्यक्त केली.

पूर्व लडाखमध्ये एप्रिल २०२० ची यथास्थिती बहाल करण्यासाठी भारताच्या प्रस्तावावर दोन्ही देशांत आगामी बैठकीत चर्चा होऊ शकते. चीनने गुरुवारी हे स्पष्ट केले. पूर्व लडाखमध्ये संघर्ष असलेल्या आघाड्यांवरून सैन्य तैनाती मागे घेण्याबाबत भारतासोबत चर्चा करण्यात विलंब केला जात नसल्याचा दावाही चीनने केला आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाआे लिजियन म्हणाले, चीन व भारत ११ व्या चर्चेच्या फेरीसाठी परस्परांच्या संपर्कात आहेत. चर्चेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

दोन्ही देशांतील सहमतीच्या आधारे भारतीय दल चीनसोबत काम करेल, अशी अपेक्षा परराष्ट्र विभागाने व्यक्त केली. कोर कमांडरस्तरीय बैठक शुक्रवारी होऊ शकते, असे भारतीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात पूर्व लडाखमधील संघर्ष असलेल्या उर्वरित आघाड्यांवरील सैन्य तैनातीला मागे घेण्यावर चर्चा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...