आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुन्हा पाकिस्तानला दहशतवाद्यांचा समर्थक देश असल्याचे संबोधले आहे. येथे भारताचे डिप्टीपरमानेंट रिप्रेझेटटेटिव्हचे नागराज नायडू यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नाही, मात्र त्यांनी हे स्पष्ट केले की आपला एक शेजारील देश केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय व मदत पुरवत आहे. भारतीय प्रतिनिधी असेही म्हणाले की दहशतवादाला शेजारील देशाच्या सरकारचाही पाठिंबा आहे.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत नागराज म्हणाले - अनेक दशकांपासून भारत प्रॉक्सी वॉर आणि सीमापार दहशतवादाचा सामना करत आहे. तेथील सरकार दहशतवादाला उघडपणे समर्थन देते आणि दहशतवाद्यांना मदत करते. या अतिरेक्यांना प्रशिक्षण, निधी, फंडिंग, गुप्त माहिती आणि शस्त्रे पुरविली जातात जेणेकरून ते आपल्या देशात हिंसाचार पसरवू शकतील.
नायडू यांनी पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले - काही देश भारताविरूद्ध प्रॉक्सी युद्ध करत आहेत. हे देश दहशतवादी गटांना सर्व प्रकारची मदत आणि पैशाचा पुरवठा करतात. जगातील सर्व देशांना एकत्र येऊन अशा देशांना सामोरे जावे लागेल. आपण दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे.
विधानाची वेळ महत्त्वाची
फायनान्शियल टास्क फोर्स (FATF) ची सध्या पॅरिस, फ्रान्समध्ये बैठक होत आहे. यामध्ये पाकिस्तान ग्रे लिस्ट किंवा काळ्या लिस्ट होण्याबाबत आज निर्णय होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सिक्योरिटी काउंसिलमध्ये पाकिस्तान विरोधात विधान आणि पुरावे देऊन भारताने सिद्ध केले आहे की, दहशतवाद किती गंभीर समस्या आहे आणि हे रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. जर पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये कायम राहिला तर त्यांच्यासाठी अडचणी वाढतली. जर ते पाकिस्तान ब्लॅक लिस्ट झाला तर त्यावर दिवाळखोरीचा धोका वाढेल. पाकिस्तान दोन वर्षांपासून ग्रे लिस्टमध्ये आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.