आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वोस्तोक 2022’:रशियन भूमीवर भारतासह चीनचे जवानही करणार युद्धसराव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लडाखमध्ये भारत व चीनमध्ये गतिरोध सुरू असून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे भारतीय लष्करासोबत चिनी लष्कर युद्धसरावातही सहभागी होणार आहे. चीनकडून सांगण्यात आले की, त्यांचे सैनिक रशियात ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘वोस्तोक २०२२’ लष्करी सरावात भाग घेतील. या सरावामध्ये भारतीय लष्करही सहभागी होत आहे. या सरावात चीनची भागीदारी रशियासोबतच्या द्विपक्षीय सहकार्य कराराचा भाग आहे. तसेच भाग घेणाऱ्या अन्य लष्करांसोबत मैत्रीपूर्ण व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे, धोरणात्मक सहकार्याला चालना देणे व सुरक्षेशी संबंधित धोक्यांना उत्तर देण्याची क्षमता मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे. बेलारूस, ताजिकिस्तान, मंगोलियाही सरावात सहभाग घेतील.

एनएसए डोभाल यांनी रशियन सुरक्षा सल्लागारांची घेतली भेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बुधवारी अचानक रशियाची राजधानी मॉस्कोला आले. तिथे त्यांनी रशियन समकक्ष निकोलाय पेत्रुशेव्ह यांची भेट घेतली. या वेळी द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांचा हा दौरा शांघाय सहकारी संघटनेची (एससीओ) सुरक्षा बैठक उझबेकिस्तानात होणाऱ्या बैठकीपूर्वीच्या तयारींबाबत असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत चीन, बेलारूस, पाकिस्तान आणि इराणचे अधिकारीही उपस्थित राहतील. या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ शकतात. भारताच्या संरक्षण सज्जतेसाठी भारताचा डिफेन्स सप्लाय समजून घेणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...