आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीच्या बर्लिनचे रहिवासी एक भारतवंशीय दांपत्य पाेटची लेक अरिहाचा ताबा मिळवण्यासाठी गेल्या पंधरा महिन्यांपासून कायदेशीर लढाई लढत आहे. मूळचे हे गुजराती जाेडपे आहे. अरिहाचे वडील येथे वर्क व्हिसाद्वारे आले हाेते. ते साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. आई धारा शहांच्या म्हणण्यानुसार पूर्वी त्यांचे जीवन सामान्य हाेते. परंतु सप्टेंबर २०२१ नंतर संपूर्णपणे पालटून गेले आहे. तेव्हा अरिहा सात महिन्यांची हाेती. तिची आजी जर्मनीला आली हाेती. त्यांच्याकडून चुकीने अरिहाच्या गुप्तांगावर आघात झाला. त्यानंतर अरिहाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आराेप झाला. मुलीला फाेस्टर केअरसाठी (इतर कुटुंबात पालनपाेषण) पाठवण्यात आले. फेब्रुवारी २०२२ मध्ये काेणत्याही चाैकशीविना तपास बंद करण्यात आला. परंतु अद्यापपर्यंत अरिहाला तिच्या आईवडिलांकडे साेपवण्यात आलेले नाही. बर्लिन चाइल्ड सर्व्हिसेसने मुलीवरील आईवडिलांचा हक्क संपुष्टात आणावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. आता हे प्रकरण दाेन-तीन वर्षे चालेल. अरिहाची आई धारा म्हणाल्या, माझी मुलगी रीतिरिवाजापासून दूर जात आहे. आम्ही मांस खात नव्हताे, परंतु नवीन कुटुंबात तिला ते खावे लागत आहे. अरिहाचे आईवडील तिला घेऊन भारतात परतू इच्छितात. परंतु त्यांच्याकडे काहीही पर्याय शिल्लक नाही. त्यांना मुलगी कायमची गमवावी लागेल, अशी भीती सतावत आहे. कारण विशिष्ट काळ फाेस्टर केअरमध्ये ठेवल्यानंतर जर्मनीतील नियमानुसार तिला खऱ्या आईवडिलांकडे पाठवले जात नाही.
जर्मनीचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, प्रकरण काेर्टात प्रलंबित, निवाड्यानंतर ठरवू मुलीचे आईवडील एक वर्षापासून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. त्यांनी हस्तक्षेप करण्याचीही विनंती केली. राजदूत फिलिप एकरमन एक आठवड्यापूर्वी म्हणाले, या प्रकरणाचे गांभीर्य ठाऊक आहे. जर्मनीचे परराष्ट्रमंत्री अन्नालेना बेअरबाॅक म्हणाले, बाळाच्या भलाईस प्राधान्य आहे. मूल आपल्या घरात सुरक्षित नसते तेव्हाच एजन्सी त्यास ताब्यात घेते. तूर्त प्रकरण काेर्टात प्रलंबित आहे. निवाड्यानंतरच काही सांगता येऊ शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.