आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकच्या कारवाईची दहशत पाकिस्तानात अद्यापही कायम आहे. बालाकोटसारखा आणखी एक एअर स्ट्राइक करण्याची भीती वाटल्यानेच पाकिस्तानी हवाई दल कराचीत वॉर गेममध्ये सहभाग घेत आहे. यात हवाईदल रात्री होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्याची तयारी करत आहे. विमानाच्या आवाजाने पाकिस्तानचे लोक प्रचंड दहशतीखाली आले आहेत. त्यांना मंगळवारी रात्री भारताने पुन्हा एअर स्ट्राइक केल्याची भीती वाटली. भारताच्या हल्ल्याच्या भीतीने मंगळवारी रात्री कराची ब्लॅक आऊटही करण्यात आला होता. मंगळवारी रात्री पाकिस्तानातील अनेक युजर्सनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी फायटर जेट कराची व बहावलपूर येथे घिरट्या घातल्याचा दावा केला आहे. कराचीतील लाराइब मोहिब या नागरिकाने टिवटरवर म्हटले, आपण विमानतळाजवळ फायटर जेट विमान पाहिले हे ठामपणे सांगतो आहोत. काही युजर्संनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे छायाचित्रही शेअर केले आहे. भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा कोणत्याही कारवाईचा इन्कार केला आहे.
पाकमध्ये भितीपोटी वॉर गेमचा सराव
गेल्या आठवड्यातही पाकिस्तान हवाई दलाचा आकाशात सराव सुरू होता. पाकिस्तानचे हवाई दल आता वॉर गेममध्ये सहभागी होत आहे. याचा कोड नेम हाय मार्क आहे. भारतीय हवाई दल या हालचालीवर व पाक हवाई दलाच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे. या वॉर गेमचा उद्देश फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या बालाकोटसारख्या हवाई हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी हवाई दलाच्या (पीपीएफ) वॉर गेममध्ये त्यांची सर्व फायटर जेट यात सहभागी होत आहेत. यात जेएफ-१७, एफ-१६, व मेराज - ३ यांचा समावेश आहे. पीपीएफने याची माहिती हवाई वाहतूक मंत्रालयास दिली अाहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.