आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संगीतकार रिकी केज यांना अलीकडेच गाजलेल्या ‘डिव्हाइन टाइड्स’ अल्बमसाठी ग्रॅमी अवाॅर्डने गाैरवण्यात आले. त्यांना हा पुरस्कार ‘बेस्ट इमर्सिव्ह आॅडिआे अल्बम’ श्रेणीत ब्रिटिश राॅकबँड ‘द पाेलिस’चे ड्रमर स्टिव्हर्ट काेपलँड यांच्यासह विभागून देण्यात आला. रिकी यांचे हे तिसरे ग्रॅमी आहे. तीन ग्रॅमी अवॉर्ड मिळवणारे रिकी पहिले भारतीय ठरले आहेत.
५ आॅगस्ट १९८१ रोजी अमेरिकेच्या नाॅर्थ कॅराेलिनामध्ये जन्मलेले व मूळचे बंगळुरूचे रिकी यांनी २०१५ व २०२२ मध्येही ग्रॅमी जिंकला हाेता. अमेरिकेतील लाॅस एंजलिस येथे आयाेजित कार्यक्रमात रिकी व काेपलँड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिकी यांनी साेशल मीडियावर भावना व्यक्त केली. तिसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. आभारी आहे. हा पुरस्कार भारताला समर्पित करताे, असे त्यांनी म्हटले आहे.
बेयाॅन्सेला ३२ वा ग्रॅमी, नवा इतिहास : अमेरिकेची प्रसिद्ध गायिका व डान्सर बेयाॅन्सेने ३२ वा ग्रॅमी अवॉर्ड जिंकून नवा इतिहास लिहिला. आता सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार बेयाॅन्सेच्या नावे झाले आहेत. त्यांना ‘रेनेशां’ साठी डान्स व इलेक्ट्राॅनिक अल्बमचा अवॉर्ड मिळाला. बेयाॅन्सेने हंगेरी वंशाचे ब्रिटिश संगीतकार जाॅर्ज साेल्टी यांचा विक्रम माेडला. साेल्टी यांच्या नावावर ३१ ग्रॅमी पुरस्कार हाेते. बेयाॅन्सेला ‘ब्रेक माय साेल’साठी सर्वाेत्कृष्ट ‘डान्स-इलेक्ट्राॅनिक’ संगीत रेकाॅर्डिंग श्रेणी व ‘प्लास्टिक आॅफ द साेफा’साठी सर्वाेत्कृष्ट पारंपरिक ‘आर अँड बी’ श्रेणीत पुरस्कार मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.