आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपब्लिकन पार्टीत दावेदारीची घोषणा 15 रोजी शक्य:अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदारीत ट्रम्पना टक्कर देण्याच्या तयारीत भारतवंशीय निकी हेली

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वंशाच्या रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या निक्की हेली पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारी रोजी आपल्या दावेदारीची घोषणा करू शकतात. तसे झाल्यास त्या माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या पक्षाच्या पहिल्या नेत्या असतील. हेली दोन वेळा दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिलेल्या आहेत आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत म्हणून सेवाही दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पक्षाकडून २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी गेल्या वर्षी दावेदारी केली होती. द पोस्ट अँड कुरियर या वृत्तपत्रानुसार, हेलींच्या समर्थकांना लवकरच हेली यंाच्याकडून १५ फेब्रुवारीला एका विशेष घोषणेचा उल्लेख करण्यासंबधीत निमंत्रण पत्र मिळू शकते. हा कार्यक्रम “चार्ल्सटन व्हिजिटर सेंटर’च्या “द शेड’मध्ये हाेणार असून त्यात त्यांचे समर्थक जमा होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...