आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय विद्यार्थ्यांचे ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगत आहे. वाढत्या महागाईमुळे सुमारे साडेचार लाख भारतीय विद्यार्थ्यांपैकी एकचतुर्थांशवर ड्रॉप आऊटचा धोका वाढला आहे. सुमारे १.२७ लाख विद्यार्थी मागील वर्षी ब्रिटनमध्ये आले होते. दैनिक भास्करशी बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते एक वेळच्या जेवणावर गुजराण करताहेत.मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थी कर्ज घेऊन ब्रिटनला आले आहेत. दोन वेळ जेवण करणे कठीण झाले आहे. यामुळे ते एकच वेळ भरपेट जेवण करतात. सप्टेंबर, २०२२ नंतर मध्यमवर्गीय कुटुंबातील ३३ टक्के विद्यार्थी एकच वेळ जेवण करत आहेत. ६३% विद्यार्थी खाणे आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदीत काटकसर करत आहेत.
सटन ट्रस्टच्या सर्वेक्षणात समोर आले की, अनेक भारतीय विद्यार्थी कॉलेज-युनिव्हर्सिटीचे वर्ग सोडून पार्टटाइम जॉब करत आहेत. मँचेस्टर विद्यापीठात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना विद्यापीठाकडून मेंटेनन्स लोनही मिळते. परंतु ते पुरेसे नाही. ४३ % विद्यार्थ्यांनी वीज-गॅस बिलात कपात केली आहे. ४७% विद्यार्थ्यांनी फिरणे बंद केले. लेबर पार्टीचे ज्येष्ठ नेते मॅट वेस्टर्न म्हणाले की, परप्रांतीय विद्यार्थ्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी सुनक सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. सटन ट्रस्टचे अध्यक्ष सर पीटर लॅम्पल म्हणाले की, विदेशी विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवणही न मिळणे धक्कादायक आहे. आता सुनक सरकार या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक आठवड्यातील कामाचे तास वाढवून ३० तास करण्यावर विचार करत आहे. यात ब्रिटन सरकारचे कठोर निर्णय अडचणी वाढवत आहेत. ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विदेश विद्यार्थ्यांना ६ महिन्यांत नोकरी मिळाली नाही तर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाते.
निम्म्याहून अधिक विद्यार्थी पालकांना पैसे मागताहेत निम्म्यावर विद्यार्थी भारतातील आपल्या घरून पैसे मागवत आहेत. सर्व्हेत आढळले की, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी पार्टटाइम जॉब करून दैनंदिन खर्च भागवण्याचा विचार केला होता. पण त्यातूनही हा खर्च भागत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.