आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मुक्काम आता कठीण ठरू शकताे. अमेरिकी संसदेच्या एका समूहाने संसदेच्या कनिष्ठ सभागृहात यासंबंधी एक विधेयक मांडले आहे. त्यानुसार आतापर्यंत परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेत काम करण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागे. परंतु नव्या कायद्यात ही कल्याणकारी याेजनाच गुंडाळण्याची तरतूद आहे. विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाल्यास त्याचा परिणाम अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवरही पडणार आहे.
खासदार पाॅल ए गाेसर, माे ब्रुक्स, अँडी बिग्स, मॅट गेट्ज यांनी संयुक्तपणे सभागृहात ‘फेअरनेस फाॅर हायस्किल्ड अमेरिकन अॅक्ट’ मांडण्यात आले आहे. हे विधेयक पारित झाल्यास पर्यायी अभ्यास प्रशिक्षणासाठी (आॅप्ट) स्थलांतरित तसेच राष्ट्रीयत्व अधिनियमांत दुरुस्ती शक्य हाेणार आहे. गाेसर म्हणाले, देशातील नागरिकांना वंचित करून परदेशींना राेजगार देण्याची याेजना चालवणारा एखादा देश असेल का? याेजनेचे नाव आॅप्ट आहे.
चीनचे विद्यार्थी सर्वाधिक, नंतर भारतीय
अहवालानुसार २०१८-१९ मध्ये अमेरिकेतील विद्यापीठे, महाविद्यालयात सुमारे ११,२२,३०० परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत हाेते. त्यात भारतीय विद्यार्थी १८ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर हाेते. चीन ३५ टक्के विद्यार्थ्यांसह पहिल्या क्रमांकावर राहिले. भारतानंतर दक्षिण काेरिया, साैदी अरेबिया, कॅनडाचा क्रमांक लागताे. अमेरिकेत बहुतांश परदेशी विद्यार्थी कॅलिफाेर्निया, न्यूयाॅर्क, टेक्सास, मॅसाच्युसेट्स, इलिनाॅय, पेन्सिल्वेनिया, फ्लाेरिडा, आेहियाे, मिशिगन व इंडियानामध्ये राहतात.
उच्च शिक्षणासाठी लंडन सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वाेत्कृष्ट शहर
अमेरिकेत काेराेना संकटापूर्वी २०१८-१९ मध्ये २,०२,०१४ भारतीय विद्यार्थी हाेते. भारतात अमेरिकी राजदूतांच्या संकेतस्थळावर ‘आेपन डाेर्स रिपाेर्ट-२०१९’ च्या हवाल्यातून ही माहिती देण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये २०१७-१८ च्या तुलनेत अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ३ टक्के वाढली हाेती. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा दाेन लाखांवर हाेण्याची ही पहिलीच वेळ हाेती. सलग सहाव्यांदा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली.
सलग सहाव्यांदा भारतीय विद्यार्थ्यांत वाढ
उच्च शिक्षणासाठी लंडन जगातील सर्वाेत्कृष्ट शहर ठरले आहे. शिक्षण व्यवस्थेसंबंधी विश्लेषण करणारी संस्था क्वाक्वेरेली सायमंड़्सने (क्यूएस) आपल्या अहवालात ही माहिती दिली. अहवालातील क्रमवारीत लंडन सलग तिसऱ्या क्रमांकावर राहिले. इम्पेरियल काॅलेज, किंग्ज काॅलेज लंडनसारख्या जगातील अग्रेसर शिक्षण संस्थांमुळे लंडनला हा बहुमान मिळाला. त्याव्यतिरिक्त परदेशी विद्यार्थ्यांना जास्त संधीमुळे लंडन क्रमवारी राखण्यात यशस्वी ठरले. क्रमवारीत म्युनिच दुसऱ्या क्रमांकावर, सेऊल तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर बर्लिन, मेलबर्नचा क्रमांक लागताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.