आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कांगोमध्ये 1100 अंश तप्त लाव्हाचे लोट शहरात घुसताना भारतीय सैनिकांनी 6 लाख आफ्रिकन लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कांगोमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारतीय जवानांनी तासाभरात 3 निर्णय घेऊन लाखोंचे प्राण वाचवले

संयुक्त राष्ट्राच्या न्यूयाॅर्क मुख्यालयात शनिवारी आंतरराष्ट्रीय शांती सैनिक दिन साजरा करण्यात आला. त्यात भारतीय सैनिकांच्या याेगदानाचा गाैरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. भारतीय सैनिकांनी गेल्या आठवड्यात आफ्रिकन देश कांगाेमधील निरागाेंगाे ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाखाे लाेकांना सुरक्षित ठिकाणी पाेहाेचवले. वास्तविक या भागात तेव्हा ११०० अंश एवढ्या तप्त लाव्हाच्या उसळत्या लाटा शहरात घुसल्या हाेत्या. क्षणात हाेत्याचे नव्हते करणारा हा रस. भारतीय सैनिकांनी सामान्य लाेकांना सुरक्षेची जणू ढाल दिली हाेती. सैन्याच्या सूत्रांनी दैनिक भास्करला या शाैर्य कथेबद्दल सांगितले.

संयुक्त राष्ट्राने परिस्थितीचे गांभीर्य पाहता शांती सैनिकांना तेथून बाहेर पडण्याची सूचना दिली हाेती. परंतु भारतीय नेतृत्वाने एक तृतीयांशहून जास्त जवानांना तेथेच ठेवण्याचा िनर्णय घेतला हाेता. सैनिकांचा हा तळ कांगाेतील सामान्य लाेकांच्या मदतीसाठी प्रयत्न करत हाेता. तेव्हाच्या आणीबाणीत सैन्याने तासाभरात तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. एअर असेट्सला शिफ्ट करण्यात यावे. गाेमात तैनात २३०० भारतीय सैनिकांतील ७० टक्के सैनिकांना हिम्बीमध्ये कंपनीच्या आॅपरेटिंग बेसवर पाठवण्यात यावे. उर्वरित सैनिकांना कायम ठेवणे, संरक्षण, हवाई तळ, इंधन, देखरेखीसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. निगराणी पाेस्ट तयार केली.

भारतीय सैन्याच्या या तुकडीने लाव्हा काेणत्या बाजूने वाहत येताेय, याचा माग काढला. गाेमाची लाेकसंख्या ६ लाखांवर आहे. शहरात गाेंधळ वाढला हाेता. हल्लकल्लाेळाची स्थिती हाेती. त्या क्षणी सैन्याने लाव्हाचा मोठा प्रवाह शेजारच्या रवांडा देशाच्या दिशेने वाहतोय. घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन केले. लाव्हाचा एक प्रवाह गोमाच्या दिशेने होता. सैन्याने त्याच्या संभाव्य मार्गाचा अंदाज बांधला. त्यानंतर त्या मार्गावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम पूर्ण केले.

४ हजार शांती सैनिकांनी प्राण गमावले
शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन पहिल्यांदा २९ मे १९४८ रोजी साजरा झाला होता.. तेव्हापासून ७२ शांती मोहिमांत १० लाखांहून जास्त पुरुष, महिलांनी सेवा दिली आहे. जगातील ८९ हजार शांती सैनिक १६ मोहिमांवर तैनात आहेत. दुसरीकडे ७३ वर्षांत ४ हजारांवर सैनिक शहीद झाले.

७३ वर्षांत ४९ मोहिमांत १.९५ लाख सैनिकांचे योगदान
जागतिक शांती मोहिमांत भारताने नेहमीच अतुलनीय कामगिरी केली. चिनी सैनिक भारताच्या तुलनेत दोनपट कमी आहेत. बांगलादेश, नेपाळ देखील शांती सैनिक पाठवण्यात चीन व पाकिस्तानपेक्षा पुढे आहेत. भारताने ने ७३ वर्षांत जगातील ४९ मोहिमांत १.९५ लाखांवर सैनिक पाठवले.

बातम्या आणखी आहेत...