आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेतील निवडणुकीत भारतीय आणि दक्षिण आशियातील मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडताना दिसत नाहीत. म्हणूनच ‘अमेरिका का नेता कैसा हो, जो बायडेन जैसा हो’, ‘अबकी बार ट्रम्प सरकार’सारख्या हिंदी घोषणा अमेरिकी टीव्ही, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहायला-ऐकायला मिळू लागल्या आहेत. दोन्ही पक्षांनी भारतीयांचे लक्ष वेधण्यासाठी प्रचार मोहीम करावी, असे पहिल्यांदाच घडतेय. एवढेच नव्हे तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींशी असलेल्या मैत्रीचे भांडवल करण्यासाठी ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ माेहीम चालवत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी जो. बायडेन यांची टीम १४ भारतीय भाषांत रेडिआे, टीव्हीवरील मोहिमेत ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडेन’ हे अभियान चालवत आहेत. ते पाहून ट्रम्प यांच्या रणनीतिकारांनी ‘हिंदू व्होट्स फॉर ट्रम्प’ मोहीम सुरू केली. त्यामागे हिंदू अमेरिकेतील चौथा मोठा धर्म असणे हे कारण आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी समुदायाचे प्रमाण १ टक्का आहे. बायडेनच्या टीममधील सूत्रांच्या मते, भारत व आशियातील मतदारांशी संपर्क साधताना स्थानिक भाषेचा आधार घेतला आहे. बायडेन यांचे प्रचार टीमचे सदस्य अजय भतुरिया ‘भास्कर’ला म्हणाले, ट्रम्प यांच्यापेक्षा आम्ही जास्त काळजी घेतो, असा संदेश मोहिमेतून भारतीयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बायडेन सत्तेवर आल्यास न्याय विभागात भारतीय अमेरिकींची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही टीमने दिली आहे. त्यामुळे भारतीयांच्या विरोधातील हेट-क्राइम प्रकरणांत योग्य न्याय होईल. मोदींशी असलेल्या मैत्रीचा ट्रम्प यांना फायदा होत असल्याचे अनेक पाहणीतून दिसून आले आहे. ताज्या पाहणीनुसार ६६ टक्के भारतीय-अमेरिकी बायडेन यांच्या बाजूने आहेत, तर २८ टक्के ट्रम्प यांना पाठिंबा देतात. त्यामुळे बायडेन यांच्या गोटात चिंता वाढली. कारण २०१६ मध्ये ७७ टक्के लोकांनी हिलरींना पाठिंबा दिला आणि १६ टक्के मते ट्रम्प यांना पडली होती.
२०१२ मध्ये ८४ टक्क्यांनी आेबामांच्या बाजूने मत दिले होते. २०१६ मध्ये ट्रम्प यांच्या बाजूने भारतीयांच्या मतांचा परिणाम दिसला होता. यंदा या वर्गाकडून दुप्पट पाठिंब्याची शक्यता आहे. अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा आपल्याला भारतीय-अमेरिकींचे समर्थन असल्याचे म्हटले. त्यामुळेच त्यांनी कमला हॅरिस यांची निवड केली. गेल्या महिन्यात व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला होता. मला मोदी व भारताचा पाठिंबा आहे. भारतीय-अमेरिकी आम्हालाच मत देतील याची खात्री वाटते, असा विश्वास त्यांनी दर्शवला होता. टेनेसी राज्यातील छट्टानुगा शहरातील रेस्तराँचे मालक विक्रम मल्होत्रा म्हणाले, मी या निवडणुकीत बायडेन यांच्या बाजूने आहे. ट्रम्प स्वत:ची आेळख मोदींचा मित्र अशी सांगतात. परंतु धोरणात स्थलांतरितांच्या विरोधात आहेत.
आशियाई मतदार ५० लाख, अनेक ठिकाणी निर्णायक
> अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या स्थलांतरितामध्ये भारतीयांचा समावेश होतो. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. २०११ नंतर द. आशियातील लोकसंख्येत ४३ टक्के वाढ झाली. २०१८ मध्ये ५० लाखांहून जास्त झाली.
> अमेरिकेत २० लाख भारतवंशीय मतदार आहेत. त्यापैकी ५ लाख मतदार अॅरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्वेनिया, टेक्सास, विस्कोन्सिनमध्ये राहतात. या मतदारसंघात भारतीय मतदार निर्णायक ठरू शकतात. २०१६ मध्ये ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये १० हजारांनी विजय मिळवला.
> भारतीयांचा प्रभाव असलेल्या जागांमध्ये कॅलिफोर्निया, न्यूजर्सी, इलिनॉइस, ह्यूस्टनच्या काही उपनगरांचा समावेश होतो. ट्रम्प यांच्यासाठी येथील लढाई कठीण ठरू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.