आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगाचेे तंत्रज्ञान हब सॅन फ्रान्सिस्कोपासून वित्तीय हालचालींचे केंद्र लंडन, न्यूयॉर्क वा कॅलिफोर्नियापर्यंत व्हेंचर कॅपिटल म्हणजे नव उद्योगांत गुंतवणुकीच्या क्षेत्रात निर्णय घेणाऱ्या पदांवर भारतीय महिलांची संख्या वाढत आहे. व्हेंचर कॅपिटल उद्योगात बदल घडवणाऱ्या काही महिला उद्योजकांमध्ये श्रुती भारत, आकृती डोकनिया, सिया राज पुरोहित आणि मीरा क्लार्क ही परिचीत नावे आहेत. “भास्कर’ने त्यांना सांगितले की, कृष्णवर्णीय महिलांना जिथे प्रतिनिधित्व मिळाले नाही तेथे त्या यशस्वी होतील.
मीरा क्लार्क: ऑब्वियस व्हेंचरमध्ये सीनीयर कंझ्यूमर इन्व्हेस्टर मीरा म्हणाल्या, आपल्या गुंतवणुकीचा आधार असा विश्वास आहे की, सकारात्मक व्यवसायाद्वारे बाजारातून लाभ मिळतो. त्या आपल्या पारंपारिक स्पर्धकाला मागे टाकू शकतात. त्या म्हणतात की, आईकडून खूप मदत मिळाली. ती भारतातून अमेरिकेत आली होती. तेव्हा आजी-आजोबाला वाटले होते, ती सनकी आहे. मीरा तेव्हा कॉलेजमध्ये होत्या.
आकृति डाेकनिया: लंडनमध्ये ऑक्टोपस व्हेंचर्समध्ये गुंतवणूक धोरणाचे काम सांभाळतात. ग्राहक, फिटनेस, आरोग्य तंत्रज्ञान, लाइफ सायन्स क्षेत्रांत १ कोटी पाउंड(सुमारे १०० कोटी रु.) पर्यंतची गुंतवणूक करते. त्या म्हणाल्या,लंडनमध्ये व्हेंचर कॅपिटल क्षेत्रात द.आशियाई महिला असणे खडतर व समाधानकारही आहे. युरोपमध्ये तंत्रज्ञानाचे ईकोसिस्टिम तेवढे विकसित नाही. येथे अमेरिकेसारखे भारतीय नाहीत. भारतीय महिलाही आहेत. भारतीय असण्याची ताकद जाणवते.
सिया राज पुराेहित : भविष्याच्या कामात मानवी पक्षावर केंद्रीत पाथवे व्हेंचर्सच्या सह-संस्थापक आहेत. हे उत्पन्न, शिक्षण, सार्वजनिक बांधकामाच्या नवोन्मेषी मॉडेल विकसित करणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करते.
अमेरिकेत महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या पदांवर १२% महिला
श्रुति भारत: एनजीओ ऑल रेज टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करणारे आणि स्टार्टअप उद्योजकांत समान संधींना प्रोत्साहन देतात. श्रुती फ्रान्सिस्कोत व्हेंचर प्रोग्राम पाहतात. या महिला गुंतवणूकदारांच्या करिअरला पाठिंबा देण्याचे काम करत आहेत. त्या म्हणाल्या, या क्षेत्रात भारतीय असण्याचा फायदा आहे, जो अन्य समुदायाला नाही. अमेरिकेत व्हेंचर कॅपिटल फर्म्समध्ये निर्णय घेणाऱ्या पदांवर १२% महिला आहेत. संपूर्ण व्यवसायात ६% आशियाई महिला आहेत. २% भारतीय आहेत. कृष्णवर्णीय महिला १% आहेत. २०१६ मध्ये अमेरिकेत व्हेंचर कॅपिटल क्षेत्रात केवळ ५ द.आशियाई महिला होत्या. मात्र,आता चित्र वेगाने बदलत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.