आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:अमेरिकेत ‘प्रोजेक्ट कल्पना चावला’ अंतर्गत आता भारतीय महिला वैज्ञानिकांना चंद्रावर नेण्याची मोहीम, सिरिशा बांदलाही सहभागी

न्यूयॉर्क / मोहंमद अली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भारतीय महिलेचे चंद्रावर पाऊल पडणे जवळपास निश्चित झाले आहे. ती आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठात प्रशिक्षण घेईल अशी शक्यता आहे.’ हे म्हणणे आहे डॉ. मायकेल पॉटर यांचे. भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या मित्रांनी त्यांच्या स्मरणार्थ फेलोशिप सुरू केली होती, त्याअंतर्गत भारतीय वंशाच्या महिलांना चंद्रावर नेण्याची तयारी सुरू आहे. प्रकल्प मंडळात पॉटर सल्लागार आहेत. २०२१ साठी ५ नावे अलीकडेच निश्चित करण्यात आली. असा आहे हा प्रकल्प...

कल्पनांच्या सन्मानार्थ उपक्रम : भारतीय महिलांत नेतृत्वकौशल्य विकसित करण्यावर भर
कल्पना म्हणत असत- ‘तुमचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही महिला आहात की भारतातील आहात यामुळे काही फरक पडत नाही...’ त्यांच्या याच विचाराला आम्ही ‘कल्पना चावला प्रोजेक्ट फॉर इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरिझम अँड स्पेस स्टडीज’मध्ये मूर्त रूप दिले. वैज्ञानिक क्षेत्रात भारताच्या प्रतिभावंत महिलांना आंतरराष्ट्रीय मंचावर संधी मिळावी हा त्याचा हेतू आहे. डॉ. पॉटर म्हणाले,‘आम्ही भारतीय महिला वैज्ञानिकांना अंतराळ क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मदत केली आहे, हे पाहून कल्पना जिथे कुठे असतील तिथे त्यांना आनंद होईल.’ सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये विश्लेषक राहिलेले डॉ. पॉटर म्हणाले की, ‘भास्कर’च्या माध्यमातून मी भारतीय महिलांना हे सांगू इच्छितो की, चंद्रावर उतरणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी या फेलोशिपमध्ये सहभागी व्हावे. ज्यांनी विज्ञान, वैद्यकीय, उपग्रह तंत्रज्ञान आणि अंतराळाशी संबंधित विषयांत पीजी केले आहे, ज्यांचे विचार कल्पनांसारखे आहेत अशा भारतीय महिलांना संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. भारतीय महिलांत नेतृत्व आणि तंत्रज्ञान कौशल्य विकसित करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.’ अलीकडेच अंतराळ प्रवासातून परतलेल्या व्हर्जिन गॅलक्टिकच्या भारतीय अमेरिकी अंतराळवीर सिरिशा बांदलाही या प्रकल्पात सहभागी आहेत. त्या म्हणाल्या,‘ डॉ. चावला माझ्यासारख्या लाखो महिलांसाठी प्रेरणा आहेत.’

पहिल्या तुकडीत या पाच भारतीय : या वर्षी प्रकल्पासाठी रिचल अभंग, सुचेष्णा पाटील, डॉ. सरस्वती दास, मोनिका एकल आणि डॉ. गरिमा पटेल यांची निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...