आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात नोकरकपात सुरू आहे, मात्र देशात भरतीचा हंगाम आहे. एचडीएफसी या सर्वात मोठ्या खासगी बँकेने सप्टेंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ५,८६३ आणि बंधन बँकेने २,०३६ जागा भरल्या, तर आयसीआयसीआय बँकेने मार्च तेे डिसेंबर २२ दरम्यान ११,२०० जणांना नोकरी दिली. दुसरीकडे, मॉर्गन स्टॅनली या अमेरिकी बँकेने डिसेंबर २२ मध्ये १,६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले. इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधील गोल्डमॅन सॅश या दिग्गज कंपनीने जानेवारी २३ मध्येच ३२०० कर्मचाऱ्यांना काढले. हा आकडा २००८ च्या मंदीनंतरचा सर्वात मोठा आहे. आरबीआयचा ताजा अहवाल आणि एसबीआयशी संबंधित बँकिंग तज्ज्ञ नरेश मल्होत्रा यांच्यानुसार, मागील २ वर्षे भारतीय बँकांसाठी कठीण होती, पण आता विक्रमी वाढ दिसेल.
तिकडे, अमेरिकेत नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत जवळपास २ लाख आयटी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. यापैकी ३०-४०% पर्यंत भारतीय आहेत. यात बहुतांश असे आहेत ज्यांच्याकडे एच-1बी आणि एल-1 व्हिसा होता. देशात नोकरभरतीचा वेग वाढू लागला.... प्रत्यक्षात, एच-1बी व्हिसा असणाऱ्यांची अवस्था यामुळेही अधिक वाईट आहे, कारण, ६० दिवसांत जर त्यांना नवीन नोकरी नाही मिळाली तर भारतात परत येण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल.
शुभ संकेत; यंदा २१ दिवसांतच १.१६% पर्यंत घटला देशातील बेरोजगारीचा दर : बेरोजगारांसाठी नवे वर्ष दिलासादायक ठरले. सेंटर फॉर माॅनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनुसार (सीएमआयई), एक जानेवारीला देशातील बेरोजगारीचा दर ८.३०% होता, तो २२ जानेवारीला ७.१४% वर घसरला. शहरांत हा दर ८.८% आहे, तर ग्रामीणमधये ६.४% वर आला आहे.
यांच्यासाठी चांगल्या संधी... ड्रोन पायलट, रायटरची वाढली मागणी
देशात यंदा अशा कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे, ज्यांच्या अंगी अनिश्चित आर्थिक परिस्थितीत व्यवसायवृद्धीचे आणि आरोग्यसेवेतील समस्या सोडवण्याचे कौशल्य आहे. लिंक्डइनने जानेवारी १८ ते जुलै २२ दरम्यान केलेल्या संशोधनातून काही निष्कर्ष काढले असून, त्यानुसार २०२३ मध्ये कोणत्या क्षेत्रात कशा नोकऱ्यांची अधिक मागणी असेल...
1. आरोग्यसेवा; अडीच वर्षांपर्यंत अनुभव असणाऱ्यांना संधी
पद; मेडिकल रिक्रूटर. पात्रता; क्लिनिकल क्षेत्रात भरती करणे, आरोग्यसेवेत कर्मचारी निवड. दूरस्थ नोकरी उपलब्धता; ४१.४% इंडस्ट्री; प्रशासन, सपोर्ट सर्व्हिस.
2. ड्रोन पायलट; ट्रान्सपोर्टेशन व मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मिळतील संधी
पात्रता; ड्रोन पायलटिंग, ड्रोन फोटोग्राफी आणि ड्रोन मॅपिंग। इंडस्ट्री; ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक आणि मॅन्युफॅक्चरिंग.
अनुभव; सरासरी २.२ वर्षे.
3. डेटा अॅनालिस्ट; उत्पादन व प्रोफेशनल सर्व्हिसेसमध्ये नोकरी
पात्रता; डेटा अॅनालिसिस, अकाउंटिंग, डेटा व्हिज्युअलायझेेशन.
इंडस्ट्री; प्रोफेशनल सर्व्हिसेस, तंत्रज्ञान, माध्यमे, मॅन्युफॅक्चरिंग
अनुभव; सरासरी २.२ वर्षे.
4. रायटर; तंत्रज्ञान व माध्यम इंडस्ट्रीत आहेत सर्वाधिक संधी
पद; कन्टेंट रायटर व स्पेशालिस्ट
पात्रता; कॉपी रायटिंग, युजर एक्स्पीरियन्स व कन्टेंट स्ट्रॅटेजी.
सरासरी अनुभव; ४.२ वर्षे.
इंडस्ट्री; तंत्रज्ञान, माध्यम, अर्थ.
5. बिझनेस डेव्हलपमेंट; मार्केट रिसर्चची योग्यता आवश्यक
पद; बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह.
पात्रता; कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि मार्केट रिसर्च.
अनुभव; सरासरी २.६ वर्षे.
6. सेल्स डेव्हलपमेंट; सुमारे ३ वर्षांपर्यंतचा अनुभव हवा
पद; सेल्स डेव्हलपमेंट ऑफिसर, मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह.
पात्रता; कोल्ड कॉलिंग (नवीन लोकांना कॉल करणे), सेल्स.
अनुभव; सरासरी २.९ वर्षे.
7. क्लोजिंग मॅनेजर; सेल्स आणि मार्केटिंगमध्ये यांची जास्त मागणी
पात्रता; रिअल इस्टेटची समज, सेल्स, मार्केटिंग आणि डील क्लोजरची योग्यता.
इंडस्ट्री; अर्थ, निर्मितीतही मागणी.
अनुभव; सरासरी २.९ वर्षे.
8. हेड ऑफ ग्रोथ; किमान ६ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे
पद; स्ट्रॅटेजिक ग्रोथ स्पेशालिस्ट. पात्रता; डिजिटल मार्केटिंग आणि ग्रोथच्या रणनीतीचे कौशल्य. इंडस्ट्री; तंत्रज्ञान, माध्यमे, मनोरंजन पुरवणारा, व्यावसायिक सेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.