आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत मध्यावधी निवडणुकीपूर्वी तीव्र विराेध असूनही डाेनाल्ड ट्रम्प यांची बाजू भक्कम होत आहे. कॅपिटल हिल हिंसाचारप्रकरणी सुनावणीत ट्रम्प यांनी सत्तेसाठी समर्थकांना हिंसाचारास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले. पण ट्रम्प हा रोख आपल्या बाजूने वळवून त्याचा उपयाेग समर्थक वाढवणे व निधी उभारण्यासाठी करत आहेत. सर्वेक्षणे सांगतात की, ५५% अमेरिकन हिंसाचारासाठी ट्रम्प यांना जबाबदार मानत नाहीत. अशा स्थितीत मध्यावधी निवडणुकीत निकराची लढत अपेक्षित आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या भारतीय समुदायाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी डेमॉक्रॅटिक व रिपब्लिकन पक्षांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीपर्यंत हा खर्च ५० दशलक्ष डाॅलर (३९० कोटी रुपये)पर्यंत जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बायडेन यांना भारतीयांची सर्वाधिक मते मिळाली होती. मात्र आता ट्रम्प यांची वाढती लोकप्रियता पाहता डेमोक्रॅटना भारतीय मते गमावणे परवडणारे नाही. अमेरिकेतीाल ६ राज्यांतील १० जिल्ह्यांत भारतीय किंगमेकर आहेत.
किंगमेकर : ६ राज्यांचे राज्यपाल, संसद सदस्य निवडण्यात भारतीय निर्णायक -२०२० च्या निवडणुकीत इतर समुदायांच्या तुलनेत भारतीय-अमेरिकनाच्या मतदानात सर्वाधिक १०% वाढ नोंदवली गेली. -भारतीय अमेरिकन अशा प्रकारे विस्तारले की त्यांचे मतदान किमान ६ राज्यांचे राज्यपाल व संसद सदस्य ठरवण्यात निर्णायक आहेत. -अमेरिकी जनगणना विभागाच्या मते १० संसदीय मतदारसंघांतील लाेकसंख्येत ६ ते १८ टक्के भारतीय आहेत. -ते कॅलिफोर्निया, व्हर्जिनिया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, टेक्सास, इलिनॉय येथे १० काँग्रेस आणि १५ महापौर जागांवर निर्णायक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.