आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला पाठवत आहेत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर; 10 दिवसांपूर्वी होती शून्य मागणी, आता 55 टक्क्यांनी वाढली

मेलबर्न2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातील प्राणवायूचा तुटवडा लक्षात घेऊन परदेशातून नातेवाईक, आप्तेष्टांसाठी केली व्यवस्था

भारतात प्राणवायूचा जाणवत असलेला जबरदस्त तुटवडा लक्षात घेऊन अाता अनिवासी भारतीय परदेशातून अापले नातेवाईक अाणि अाप्तेष्टांसाठी अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची व्यवस्था करत अाहेत. अाॅस्ट्रेलियात राहणारे अमित सिंगला यांनी पतियाळातील नाभा येथे काेराेनाबाधित नातेवाइकासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च करून अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर पाठवला अाहे. यासाठी भारत सरकारला जीएसटीच्या रूपाने जवळपास २५ हजार रुपयांची रक्कमही भरली अाहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बहुतांश देशांनी भारताबराेबर फ्लिगट‌्स बंद केल्याने जे अनिवासी भारतीय जेथे अाहेत तेथेच अडकून पडले अाहेत. अनेकांचे अाई-वडील भारतात एकटे असून त्यांना इच्छा असूनही त्यांच्यापर्यंत पाेहोचता येत नाही.

ब्रिस्बेनमधील ट्वुमब्बा येथे राहणारे साेनिपतचेे सिद्धार म्हणाले की, साेनपतमध्ये राहणाऱ्या सामान्य जनतेसाठी १० अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर पाठवले अाहेत. दुसरीकडे सिडनीमध्ये वैद्यकीय उपकरण व्यावसायिक साहिल एस.शाह म्हणाले, १० दिवस अाधी अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरसाठी शून्य मागणी हाेती.. त्यांनी अातापर्यंत १५० लाेकांनी संपर्क साधला अाहे. ५ अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची नाेंदणी अहमदाबादच्या स्वयंसेवी संस्थेसाठी केली अाहे. अाणखी ५५ अाॅर्डर अाल्या अाहेत. शाह म्हणाले अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचे उत्पादन अमेरिका व चीनमध्ये हाेत अाहे. त्यांनी चीनमधील वक कंपनीशी संपर्क साधला अाहे. ७ लिटर क्षमतेचा अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर केवळ २० हजार रुपयांत उपलब्ध अाहे अाणि जवळपास इतकाच खर्च भारतात पाठवण्यासाठी येत अाहे. चीनमधून भारतात सात दिवसांत अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर पाेहोचताे. भारत सरकारने सध्या वैद्यकीय उपकरणांवरील सीमाशुल्क हटवले अाहे. एका घरासाठी फक्त २ अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर अायातीची परवानगी अाहे.

दिल्लीच्या श्रीमंत घरात तयार होत आहेत आयसीयू
ऑस्ट्रेलिया शीख सपोर्ट नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची व्यवस्था करणारे उद्योगपती तरुणद्वीप म्हणतात की, ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांनाच ते ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देतात. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी केली जात आहे. ते म्हणतात की लोकांनी साठेबाजी सुरू केली आहे. दिल्लीतच श्रीमंत लोकांनी घरी आयसीयू तयार केला आहे. यामुळे, बाजारात जीव वाचवणाऱ्या अनेक उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला अाहे. ही मागवण्यासाठी १५ दिवस लागतात अाणि अशा वेळी गंभीर रुग्णाला जिवंत ठेवणे कठीण जात अाहे.

ग्रुपद्वारे कॉन्सेन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी एकमेकांना मदत
भारतीय वंशाच्या लाेकांनी अाॅस्ट्रेलियात अनेक फेसबुक अाणि व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केले अाहेत. एकमेकांची मदत करण्यासाठी माहितीचे अादानप्रदान केले जाते. अशाच एका ग्रुपमधील सिद्धार्थ भारद्वाज म्हणाले की, काेणता अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर काेणत्या वेळी याेग्य अाहे याची सामान्यांना माहिती नाही. सिद्धार्थच्या कुटुंबात अनेक जण डाॅक्टर असल्याने ही माहिती घेऊन ताे या ग्रुपमध्ये अाॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी लाेकांची मदत करत अाहे.

बातम्या आणखी आहेत...