आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्काॅटलंडमध्ये फर्स्ट मिनिस्टरच्या स्पर्धेत नॅशनल पार्टीचे (एसएनपी) नेते आणि पाकिस्तानी वंशाचे हमजा युसूफ आघाडीवर आहेत. फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी गेल्या महिन्यात राजीनामा देऊन निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर नवीन फर्स्ट मिनिस्टर निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. युसूफ स्टर्जन यांच्यासोबतच आरोग्यमंत्री आहेत. इंडियन डायस्पोरा त्यांच्या उच्च पदाच्या दावेदारीच्या विरोधात आहे. स्कॉटलंडमध्ये भारतीयांची संघटना इंडियन काैन्सिल ऑफ स्कॉटलंडच्या नेत्यांनी े दैनिक भास्करला सांगितले की, युसूफ फर्स्ट मिनिस्टर झाल्यास भारतीय समुदाय सुरक्षित राहणार नाही. यामुळे समुदाय कॅट फोर्ब्सला पाठींबा देत आहे. कौन्सिलचे अध्यक्ष नील लाल म्हणाले, ‘जर युसूफ फर्स्ट मिनिस्टर झाले तर हे स्कॉटलंडसाठी आर्थिक संकट ठरेल. ते आमच्या चिंतेबद्दल मैत्रिपूर्ण किंवा संवेदनशीलही नाहीत.’
वांशिक भेदभाव करतात युसूफ : लाल म्हणाले की, भारतीय समुदायात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि ज्यू असे सर्वधर्मीय आहेत. आम्हाला हमजांसोबत सुरक्षित वाटणार नाही. आमचा समुदाय कायद्याचे पालन करणारा, परिश्रमी आणि देशाचा अभिमान बाळगणारा आहे. युसूफ यांनी एका रोपवाटिकेवर उघडपणे हल्ला केला आणि क्षमा न मागता निघून गेले.’ लाल यांनी युसूफ याच्यावर भारतीय डायस्पोरामध्ये वांशिक आधारावर विभागणी केल्याचा आरोपही केला आहे.
तीन नावे : युसूफ आणि फाेर्ब्समध्ये टक्कर, निकाल २७ रोजी युसूफशिवाय आणखी दोघे या पदाच्या शर्यतीत आहेत. यात देशाच्या अर्थमंत्री कॅट फोर्ब्स आणि स्कॉटिश संसदेचेे तरुण व अनोळखी चेहरा अॅश रीगन यांचा समावेश आहे. युसूफ, स्टर्जनचे आवडते आहेत. फर्स्ट मिनिस्टरसाठी दावेदाराला १०० सूचक हवेत आहेत.
प्रत्येक जबाबदारीत अपयशी इंडियन कौन्सिलने म्हटले की, युसूफ यांनी जो विभाग सांभाळला, त्यात त्यांना अपयश आले. न्यायपासून ते परिवहन आणि आता आरोग्य विभागातही ते अपयशी ठरले आहेत. स्टर्जन भारतीयांसोबत मैत्रिपूर्वक नाहीत की त्यांचे चाहते युसूफ. युसूफ यांना अनेकदा भारतीय समुदायाने बोलावले होते. परंतु ते आले नाहीत.
फोर्ब्स भारतात शिकल्या फोर्ब्स ख्रिश्चन असून त्या धर्माबाबत कट्टर आहेत. त्या स्कॉटलंडमध्ये जन्मल्या असल्या तरी अनेकदा भारतात आल्या. त्या मसुरीतील शाळेत शिकल्या आहे. त्या म्हणाल्या होत्या की, स्कॉटलंड आणि भारत यांच्यात एकच गोष्ट समान होती आणि ती म्हणजे देव.आम्ही एका साध्या कुटुंबातील होतो आणि भारतात राहत होतो.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.