आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Indians Stranded At Kabul Airport Said No One Here To Listen, No One Picks Up The Phone Nothing Is Known About The Flight

अफगाणिस्तानातील भारतीय:अजुनही काबुल विमानतळावरच अडकले भारतीय नागरिक! म्हणाले- फ्लाइट कधी येणार माहिती नाही, कुणी फोन सुद्धा उचलत नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या राजधानीत अजुनही भारतीय नागरिक अडकले आहेत. भारताकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या गैरव्यवस्थापनावर ते नाराज आहेत. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. त्यातील एकाने सांगितले, की आमचे कुणीही ऐकत नाही. फ्लाइट कधी येणार माहिती नाही. कुणी फोन सुद्धा उचलायला तयार नाही. बाहेर पाहा, गोळीबार सुरू आहे.

हे सर्व भारतीय विमानतळावर एका कोपऱ्यात बसून फक्त विमानाची वाट पाहत आहेत. सर्वांचे पासपोर्ट आणि कागदपत्रे सुद्धा तयार आहेत. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारताकडून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी C17 ग्लोबमास्टर विमान पाठवले जात आहे. 129 भारतीयांना रविवारीच मायदेशी आणले गेले. सोबतच अफगाणिस्तानचे काही खासदार आणि उच्चायुक्त सुद्धा भारतात पोहोचले.

सगळीकडे धोका, लुटले जाण्याचीही भीती
आणखी एका भारतीयाने एक व्हिडिओ जारी केला. त्यानुसार, "माझ्यासोबतच आणखी भारतीय आहेत. आम्ही बाहेर निघू शकत नाही. कारण, बाहेर गोळ्या झाडल्या जात आहेत. येथे चोर आणि लुटारूंची भीती आहे. भारताचे विमान कधी येणार आम्हाला काहीच पत्ता नाही. आम्हाला आधी दुपारी 12.30 ची वेळ देण्यात आली होती. आता दूतावासात कुणी फोन देखील उचलत नाही. आमच्याकडे कसलीही माहिती नाही. विमानतळाबाहेर 4 लाख लोक उभे आहेत. प्लीज आमची मदत करा."

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले- भारतीयांना लवकर आणा
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या 200 शिखांसह सर्वच भारतीयांना लवकरात लवकर आणण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी परदेशात अडकलेल्या भारतीयांची तत्काळ व्यवस्था करा असे आवाहन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना केले. तर दुसरीकडे जर्मनी आणि डेनमार्क आपल्या नागरिकांना अफगाणिस्तनातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानची मदत घेत आहेत.

रशिया, चीन आणि पाकिस्तानचे तालिबानला समर्थन?
पाकिस्तान आणि रशिया या दोन्ही देशांनी आपले अफगाणिस्तानातील दूतावास बंद करणार नाही असे स्पष्ट केले आहे. वेळ आल्यावर सत्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय मते जाणून तालिबान सरकारला मान्यता देण्याचा विचार केला जाईल असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. तर रशियाने सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली. याच दरम्यान, पाकिस्तानचे दोन विमान विमानतळावर परवानगी न मिळाल्याने अडकले आहेत. या विमानातून पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात नेले जाणार आहे. चीनने सुद्धा अफगाणिस्तान आणि तालिबानसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची तयारी दर्शवली आहे.

बातम्या आणखी आहेत...