आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयुक्त राष्ट्र /:सुरक्षा परिषदेच्या अस्थाई सदस्यपदी भारताची 8 व्यांदा निवड, अमेरिकेने म्हटले - जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण एकत्र काम करू

न्यूयॉर्क10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची वर्षांमध्ये 8 व्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थाई सदस्य म्हणून निवड
  • 193 सदस्यांच्या महासभामध्ये भारताला 184 देशांनी समर्थन दिले

भारत 8 वर्षांमध्ये आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला आहे. बुधवारी झालेल्या वोटिंगमध्ये महासभेच्या 193 देशांनी सहभाग घेतला. 184 देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अस्थाई सदस्यत्त्वाचे स्वागत केले आहे. अमेरिकेने म्हटले की, जगातील शांतता आणि सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका एकत्र काम करतील.

संयुक्त राष्ट्र चार्टरनुसार, भारत दोन वर्षांसाठी अस्थाई सदस्य म्हणून निवडला गेला आहे. भारतासोबतच आयरलँड, मॅक्सिको आणि नॉर्वेही अस्थाई सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. 

हा संबंधांचा विस्तार
भारताला अस्थाई सदस्य बनवण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेने एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले होते की, “आम्ही भारताचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. जगातील शांतता पूर्वस्थिती आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर दोन्ही देश एकत्र काम करतील. दोन्ही देशांमध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. आम्हाला हे आणखी पुढे नेण्याची इच्छा आहे."  

पाकिस्तान अस्वस्थ

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात भारताला अस्थाई सदसत्य मिळाल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. मतदानापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले- यूएनएससीमध्ये भारताचे अस्थाई सदस्यत्व आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. या व्यासपीठावरून उठविण्यात येणारे प्रस्ताव भारताने नेहमीच नाकारले आहेत. भारत अस्थाई सदस्य झाल्यानाही असेही काही विशेष होणार नाही.  पाकिस्तानदेखील सात वेळा तात्पुरता सदस्य झाला आहे.

सुरक्षा परिषदेत एकूण 15 देश

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देश आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन कायमस्वरुपी सदस्य देश आहेत. त्याचबरोबर 10 देशांना अस्थाई सदस्यत्व देण्यात आले आहे. यामध्ये बेल्जियम, कोट डी-आइवरी डोमिनिकन रिपब्लिक, गिनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवैत, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समावेश आहे.

अस्थाई सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षे
अस्थाई सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. यासाठी यूएनएससी दरवर्षी पाच स्थाई सदस्यांच्या जागा वगळता पाच अस्थाई सदस्यांसाठी निवडणुका घेते. 

अशी होते निवडणूक 
193 सदस्य असणाऱ्या संयुक्त राष्ट्रात भारताला विजयासाठी दोन तृतियांश म्हणजेच 128 सदस्यांचे समर्थन हवे असते. सदस्य देश सीक्रेट बॅलेटच्या माध्यमातून वोटिंग करतात. भारताचा कार्यकाळ 1 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे. 
 
कधीकधी अस्थाई सदस्य म्हणून निवडला गेला भारत 
भारत आठव्यांदा सुरक्षा परिषदेचा अस्थाई सदस्य म्हणून निवडला गेला आहे. यापूर्वी 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 आणि 2011-12 मध्ये भारताने ही जबाबदारी पार पाडली आहे. 

बातम्या आणखी आहेत...