आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • India's First Female Vice presidential Candidate In The US, Democrat Gives Opportunity To Kamala Harris

अमेरिकी निवडणूक:अमेरिकेमध्ये उपराष्ट्राध्यक्षपदासाठी प्रथमच भारतवंशीय महिला उमेदवार, डेमोक्रॅट्सकडून कमला हॅरिस यांना संधी

न्यूयॉर्कहून दै.भास्करसाठी मोहंमद अलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन यांची आधी मिशिगनच्या गव्हर्नरांना पसंती, मात्र कृष्णवर्णीयांना आकर्षित करण्यासाठी बदल

अमेरिकेतील पहिल्या भारतवंशीय सिनेटर कमला हॅरिस यांनी नवा इतिहास रचला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी कमलांना रनिंग मेट म्हणजेच उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे. प्रथमच मोठ्या पक्षाने उपराष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय-अमेरिकी, आफ्रिकी-अमेरिकी व आशियाई-अमेरिकी वंशाच्या महिलेची निवड केली. कमला विजयी झाल्या तर त्या पहिल्याच महिला उपराष्ट्राध्यक्ष असतील. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला (५५) डेमाेक्रॅटिक पार्टीत ७७ वर्षीय बायडेनच्या विरोधक होत्या. त्या आधी स्वत: राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, आर्थिक रसद तोकडी असल्याचे म्हणत त्यांनी माघार घेतली होती.

आधी आईचे स्मरण

कमला लिहितात, ‘मी आईचे स्मरण करतेय. ती स्मार्ट, निर्भीड व माझी पहिली प्रचारक होती. तिचे विचार मला मूल्यांचा लढा देण्यास प्रेरित करतात.’ आई श्यामला चेन्नईच्या होत्या. त्यांनी अमेरिकेत पीएचडी केली. जमैकाच्या डोनाल्ड हॅरिस यांच्याशी लग्न केले. नंतर घटस्फोट झाला होता.

इनसाइड स्टाेरी : बायडेन यांची आधी मिशिगनच्या गव्हर्नरांना पसंती, मात्र कृष्णवर्णीयांना आकर्षित करण्यासाठी बदल

उपराष्ट्राध्यक्षपदासाठी बायडेन यांची पहिली पसंती मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेचन व्हिटमर होत्या. दरम्यान, पोलिस कारवाईत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर वंशभेदाविरुद्ध मोठे आंदोलन पेटले. या पार्श्वभूमीवर ग्रेचन यांनीच बायडेन यांना पत्र लिहून कृष्णवर्णीय महिलेला उमेदवारी देण्याची शिफारस केली. डेमोक्रॅटिक पार्टीच्या इतर सदस्यांनीही अशीच मागणी केली होती. आंदोलन तीव्र झाल्याने पक्षाच्या अनेक सदस्यांनी कमलांचेच नाव उचलून धरले.

कमलांना उमेदवारी देण्याची ४ मोठी कारणे १२% कृष्णवर्णीय, १३ लाख भारतीय निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात

1. स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या अमेरिकेत १२% कृष्णवर्णीय, तर १३ लाख भारतवंशीय मतदार आहेत. या दोन्ही वर्गांवर कमला यांची चांगली पकड आहे. यामुळे निवड झाली.

2. महिलांवर फोकस : ओबामा यांच्यानंतर कमला या अमेरिकेतील गौरवर्णीय महिलांचा पाठिंबा मिळवणाऱ्या उमेदवार ठरू शकतात. त्यांनी महिलांसाठी आंदोलनेही केलेली आहेत.

3. मध्यमवर्गाचा आवाज : कॅलिफोर्नियात २०११ मध्ये कमला अॅटर्नी जनरल बनल्या. मंदीत कर्जफेड न करू शकणाऱ्यांचा आवाज बनल्या. बँकांना नियम शिथिल करावे लागले.

4. ट्रम्प यांच्या प्रतिमेला उत्तर : ट्रम्प यांना विरोध सहन होत नाही. आपण विरोधकांसोबतही काम करू शकतो हे बायडेन यांना दाखवायचे आहे. कमला या बायडेन यांच्या विरोधक होत्या.

बातम्या आणखी आहेत...