आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:भारताने उतावीळपणे देश खुला केल्याने कोरोनाचे भीषण संकट ओढवले : फाउची

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी खासदारांचा सल्ला - भारतासारखा गलथानपणा करू नका

कोरोना स्थिती हाताळण्यात भारताने केलेल्या चुकांतून धडा घेण्याचा सल्ला अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची यांनी तेथील खासदारांना दिला आहे. ते म्हणाले, आपल्याकडे कोरोना संपला आहे, हा गैरसमज करून भारताने वेळेआधीच देशात व्यवहार खुले केले. यामुळे भारतात भयंकर स्थिती उद्भवली. महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे भारतातील अनेक राज्ये सध्या रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लसी, ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याला सामोरी जात आहेत.

मंगळवारी कोरोनावर सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार तथा पेन्शन समितीपुढील सुनावणीत फाउची म्हणाले, रुग्णसंख्या वाढूनही चुकीची धारणा बनवल्याने भारतातील संकट उद्भवले. कोरोना संपल्याचे सांगण्यात आले. यानंतर तेथे वेळेआधीच सर्वकाही उघडण्यात आले. आता त्याचा परिणाम दिसतोय. सिनेटर पॅटी मुरे म्हणाले, अमेरिकेत जोवर ही महामारी सर्व ठिकाणी संपणार नाही तोवर ती संपल्याचे घोषित करता येणार नाही हे आपल्याला भारताच्या स्थितीतून शिकावे लागेल.

जगात कुठेही महामारी असली तर कुणीही सुरक्षित नाही
अमेरिकेने भारताकडून काय धडा घ्यावा, या प्रश्नावर डॉ. फाउची म्हणाले, स्थितीला कमी लेखू नये, हे सर्वात महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे, सार्वजनिक आरोग्य सुविधांची सद्य:स्थिती. भविष्यातील महामारीचा मुकाबला करण्याची तयारी करावी लागेल. अाणखी एक धडा म्हणजे, जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक प्रयत्न गरजेचे आहेत. ही फक्त आपलाच देश नव्हे तर इतर देशांनाही आधार देण्याची वेळ आहे.

बातम्या आणखी आहेत...