आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • India's Hindutva Seems Dangerous To Pakistan; Kashmir On The Agenda, Security Policy Announced | Msrsthi News

शेजारी बेहाल:भारताचे हिंदुत्व पाकला वाटते धोक्याचे; अजेंड्यावर काश्मीर, सुरक्षा धोरण जाहीर, देशाची आर्थिक स्थिती वाईट

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने शुक्रवारी देशाचे पहिले सुरक्षा धाेरण जाहीर केले. सुमारे ११० पानांच्या या सुरक्षेसंबंधी दस्तएेवजापैकी ५० पानेच जाहीर करण्यात आली आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे सर्वात आधी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागणार आहे, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माेईद युसूफ म्हणाले, आर्थिक सुरक्षेच्या माध्यमातून जनतेचे संरक्षण करणे हाच या धाेरणामागील उद्देश आहे. युसूफ म्हणाले, भारतातील हिंदुत्व पाकिस्तानसाठी धाेका आहे. भारतात राजकीय स्वार्थासाठी कथितरीत्या उन्माद माजवला जात असल्याचे युसूफ यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचा मुद्दा दाेन्ही देशांतील संबंधांचा प्रमुख धागा राहणार आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, काश्मीरविषयी पाकिस्तानचे धाेरण पू्र्वीप्रमाणेच राहील. त्यात काहीही परिवर्तन झालेले नाही. काश्मीरबाबत भारताचे धाेरण याेग्य नाही. पाकिस्तानच्या सुरक्षा धाेरणात या गाेष्टीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. भारतासाेबतचे संबंध दृढ करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. उभय देशांत आर्थिक संबंध वाढवण्याचीदेखील गरज आहे, असे युसूफ यांनी सांगितले.

आर्थिक आत्मनिर्भरतेवर भर
कारण दहशतवादाचे उच्चाटन करता आले नसल्याने एफएटीएफच्या ग्रे यादीत. जागतिक बँकेकडून कर्ज नाही.
आपण केवळ सैन्याची काळजी घेतो : इम्रान

संपत्तीचे समान वितरण होणार
कारण पाकिस्तानची एक तृतीयांश लोकसंख्या दारिद्य्र रेषेखाली जगते. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने विरोध वाढू लागलाय.

कायद्याचे शासन लागू
कारण उत्तर पश्चिमेकडील क्षेत्र व बलुचिस्तानमध्ये समांतर सरकार सुरू आहे. दहशतवादी संघटनांवर पाक सरकारचा अंकुश नाही.

चीनशी दृढ मैत्री होतेय
कारण चीनकडून भारताविरोधात मदत मिळते. सीपॅकमुळे चीनची पाकिस्तानात सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे संरक्षण धाेरण तयार करण्यात आले आहे, असा प्रचार इम्रान यांच्यामार्फत केला जात आहे. लष्करासमाेर स्वत:ची उंची वाढवण्याचा इम्रान यांचा उद्देश आहे. आजवरच्या सरकारने केवळ लष्करावर लक्ष केंद्रित केले हाेते, केवळ सैन्याची काळजी घेतो, असे इम्रान यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...