आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसंख्या वाढीच्या समस्येला तोंड देणाऱ्या जगासाठी चांगली बातमी आहे. जगाची लोकसंख्या पुढील शतकात कमी होणार आहे. एका ताज्या संशाेधनानुसार २०६४ पर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ अब्जावर पाेहोचेल. त्यानंतर २१०० मध्ये त्यात घट होऊन लोकसंख्या ८.७९ अब्ज होईल. लॅन्सेट नियतकालिकात प्रकाशित अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. शतकाच्या शेवटी भारतात लोकसंख्या २९ कोटींनी कमी होईल. वृद्धत्वाकडे वेगाने झुकणाऱ्या चीनमध्ये २१०० पर्यंत लोकसंख्या निम्म्यावर येईल. तूर्त चीनची लोकसंख्या १४० कोटी असून त्यात ६६.८ कोटी घट होईल. म्हणजेच ७४ कोटी एवढी लोकसंख्या राहील, असा अंदाज आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशाेधकांच्या म्हणण्यानुसार लोकसंख्येत घट होण्याचा ट्रेंड पाहायला मिळेल. ताे अपरिवर्तनीय असेल. परंतु हा दावा संयुक्त राष्ट्राच्या दाव्याच्या विरोधी आहे. कारण २१०० मध्ये जगाची लोकसंख्या ११ अब्जांवर जाईल, असे म्हटले होते. सध्या जगाची ८ अब्ज एवढी लोकसंख्या आहे.
चीनमध्ये तरुण विवाहापासून लांब
चीन : लोकसंख्येत घट होण्यामागे अपत्य होऊ देणाऱ्या महिला कमी होणार, संगाेपन महागडे, तरुण विवाहापासून लांब हेही कारण.
इटली : २०१७ मध्ये लोकसंख्या ६.१ कोटी. शतकाअखेर २.८ कोटी असेल. लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकली आहे.
जपान: शतकाअखेरीस श्रम करणाऱ्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे लोकसंख्येत घट होईल. वृद्धसंख्या वाढीचेही कारण.
दक्षिण कोरिया : वेगाने लिंग समानता वाढली. स्वावलंबन, महागाईमुळे तरुण वर्गात कुटुंब वाढवण्याच्या इच्छेत घट झाली.
ब्राझील : टीव्ही मालिकांमध्ये लहान कुटुंब दाखवल्याचा परिणाम वाढला. किशाेरवयीनांत गर्भधारणेच्या समस्यांत वाढ.
प्रजनन दर कमी, शहरीकरणाचाही परिणाम
अमेरिकेत मुलाच्या संगाेपनावरील खर्च सुमारे २ कोटी रुपये आहे. त्यामुळे लोक कमी अपत्ये होऊ देतात. शिक्षित, नोकरदार महिला उशिराने अाई होण्याचा विचार करतात. १९६० मध्ये जगभरात एक महिला सरासरी ५.२ अपत्ये जन्माला घालत होती. आज हे प्रमाण २.४ मुलांवर आले. २१०० पर्यंत ते १.६६ वर जाईल.
युरोपसोबतच दक्षिण अमेरिकेतही घट शक्य
युरोपप्रमाणेच दक्षिण अमेरिका, आशियातही लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असा दावा संशाेधनातून करण्यात आला. आफ्रिकेत मात्र लोकसंख्या हळूहळू वाढू लागेल. नायजेरियात ७८ वर्षांत लोकसंख्या ५८ कोटीने वाढेल, असा अंदाज आहे. त्यावरून घट किती मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.